शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

हिंगोलीत कर्जमाफीचे ८0 कोटी खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:00 IST

कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतकºयांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देहिंगोली : ३४ हजार शेतक-यांसाठी ११५.८0 कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतक-यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतक-यांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतक-यांनी रांगा लावल्या होत्या. १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी दुबार किती हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र ज्यांनी अर्ज भरले त्यातील अनेकांच्या अर्ज व बँकेच्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याचे निदर्शनास येत असल्यास असे अर्ज तूर्त बाजूला ठेवले आहेत. या सर्व अर्जदारांची यादी बँकांना पाठविली जाणार आहे. बँका ही यादी आपल्या नोटीस बोर्डावर डकवतील. त्यानंतर यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा शेतकºयांना रांगा लावून बँकेत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर ही यादी पुन्हा तालुकास्तरीय समितीकडे जाणार आहे. या समितीकडून पडताळणी झाल्यानंतरच संबंधित शेतकºयांच्या कर्जमाफीचे भवितव्य ठरणार आहे.येत्या पंधरा दिवसांत या शेतकºयांच्या याद्या मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच यात खºया अर्थाने कर्जमाफीपासून वंचितांचा आकडा समोर येणार आहे. मात्र ही वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ हजार १00 लाभार्थ्यांचे २३.८९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या १0 हजार ३११ शेतकºयांचे ६२.१४ लाख, तर ग्रामीण बँकेच्या ४७२0 खातेदार शेतकºयांचे २९.८२ कोटी रुपये कर्जमाफीत प्राप्त झाले आहेत.यात मध्यवर्तीचे १७ ६६३ जणांचे २३.३१ कोटी, राष्ट्रीयकृतचे ५६९६ जणांचे ३४.७७ कोटी तर ग्रामीण बँकेत ४0५२ जणांचे २३.६९ कोटी असे ८0.७८ कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत.रबी हंगाम : ६.२३ टक्के कर्जवाटपयंदाच्या रबी हंगामासाठी शेतकºयांना अवघे ९.७२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यंदा शेतकºयांना कर्जमाफीची आस लागल्याने खरीप हंगामात अनेकांनी कर्ज घेणे टाळले होते. मात्र रबी हंगामापूर्वी या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असता तर अनेकांना रबीसाठी आवश्यक कर्ज घेणे शक्य होत होते. तसेही यंदा चांगले पर्जन्य नसल्याने रबीचा पेरा घटला अन् आहे ते पीकही फारसे चांगले नाही. रबीत जि.म.स.ने कर्ज वाटलेच नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी ५२८ जणांना ८.0५ कोटी तर ग्रामीण बँकेने ३६८ जणांना १.0६ कोटी रुपये वाटले.