शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढू लागले पाठीचे आजार; ४१.२ टक्के जणांची पाठदुखीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:18 IST

कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासानंतर ६ मिनिटे पायी चालले तर पाठीच्या कण्याची हानी टाळता येईल. याशिवाय रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे घरी बसून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची पद्धत वाढली आणि यामुळे पाठीच्या कण्याची बरीच हानी झाली. कण्याची कोणत्याही प्रकारची हानी ही त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक रूपात प्रभावित करते. पीएमसी लॅबच्या एका संशोधनात म्हटले आहे की, कोविड-१९ मध्ये घरी बसून काम करणाऱ्यांपैकी ४१.२ टक्के जणांनी पाठदुखीची, तर २३.५ टक्के जणांनी मान दुखत असल्याची तक्रार केली.कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासानंतर ६ मिनिटे पायी चालले तर पाठीच्या कण्याची हानी टाळता येईल. याशिवाय रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनात म्हटले आहे की,“स्पाइनमध्ये काही ताण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर शारीरिक आणि भावनात्मक अशा दोन्ही प्रकारे होतो. सतत वाकून बसल्यामुळे कण्याच्या हाडाची डिस्क आकुंचन पावू लागते. शारीरिक हालचाली कमी झाल्यास कण्याच्या हाडाजवळचे अस्थिबंधन (लिगामेंट) कडक होऊ लागते. यामुळे कण्याच्या हाडातील लवचिकता घटत जाते परिणामी दीर्घवेळ बसल्यावर पाठ दुखू लागते.”पाठीच्या कण्याची हानी टाळण्यासाठी रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे.खांदे, पाठीच्या मांसपेशींची हानी पाठीच्या कण्याला डोक्याशी जोडणाऱ्या सर्वाइकल वर्टेब्रात तणाव निर्माण झाल्यामुळे मानेत वेदना होऊ लागतात. याचबरोबर खांदे आणि पाठीच्या मांसपेशींची हानी होते. हालचाल न होण्यामुळे मस्तिष्कात पोहोचणारे रक्त आणि प्राणवायूचे प्रमाण घटते. विचार करण्याची क्षमता प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर घरी बसून काम करणाऱ्यांनी रोज व्यायाम करावा आणि चालावे, असा सल्ला दिला जातो.