शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर
शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर
शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर- सुशील मानधानिया : महिलांना सर्वाधिक स्तनाचा कॅन्सर(डॉ. सुशील मानधानिया यांचा फोटो रॅपमध्ये आहे)नागपूर : शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची नव्याने भर पडत आहे. सध्या २९.१ टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सर आहे. १४.८ टक्के महिलांना योनीमार्गाचा, तर ५.७ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर आहे. ३५ ते ४५ वयोगटातील ५५ ते ६० टक्के पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधानिया यांनी आज पत्रपरिषदेत दिली. कॅन्सर जनजागृती सप्ताह पाळला जात आहे, त्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. मानधानिया म्हणाले, नागपुरातील अमेरिकेत महिलांसाठी वयाच्या चाळीशीनंतर मेमोग्राफी तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतात मात्र लाजाळूपणा आणि इतर गैरसमजुतीमुळे महिला ही तपासणी करून घेण्यास पुढे येत नाहीत. कर्करोग दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर मात्र महिला तपासणीसाठी जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे चाळीशीनंतर मेमोग्राफी महिलांनी केलीच पाहिजे, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, ४ हजार ५८० पुरुष आणि ४ हजार ८६७ महिला अशा एकूण ९ हजार ४४७ नागरिकांची तपासणी केली असता त्यात दरवर्षी १८८९ नवीन कर्करुग्ण आढळून आले. पुरुषांमध्ये तंबाखू, धुम्रपान, दारूचे व्यसन, लठ्ठपणा, पाश्चिमात्य जीवनशैली हे कर्करोग होण्यास महत्त्वाचे कारण आहे. महिलांमध्ये उशिरा झालेली लग्ने आणि त्यामुळे उतरत्या वयात झालेले मूल यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. नागपुरातील २५ ते ३० वयोगटातील तरुण पिढीला कॅन्सरचा धोका आहे. ४५ ते ५० वयोगटातील पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका आहे. ८० टक्के रुग्ण आजार गंभीर अवस्थेला पोहोचल्यानंतर डॉक्टरकडे जातात. अशावेळी रुग्ण बचावण्याची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.