स्वाईन आणि गॅस्ट्रोचा विळखा दोन दिवसांत स्वाईनचे ६० नवे रुग्ण ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
मुंबई: दोन दिवसांत स्वाईन फ्लूचे नवे ६० रुग्ण आढळले असून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. १० ते १६ ऑगस्ट दरम्यान गॅस्ट्रोचे २२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
स्वाईन आणि गॅस्ट्रोचा विळखा दोन दिवसांत स्वाईनचे ६० नवे रुग्ण ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
मुंबई: दोन दिवसांत स्वाईन फ्लूचे नवे ६० रुग्ण आढळले असून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. १० ते १६ ऑगस्ट दरम्यान गॅस्ट्रोचे २२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू मुंबईत मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. ऑगस्ट महिन्यातील मृतांची संख्या १० वर पोहचली आहे. वडाळा येथे राहणार्या ६४ वर्षीय पुरुषाचा १५ ऑगस्ट रोजी स्वाईनमुळे मृत्यू झाला. या पुरुषास मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. या पुरुषाला धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यता आले होते. यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्याला वोक्हार्ट रुग्णालयात हलवण्यात आले. त्याला स्वाईन फ्लूचे उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लेप्टाचे गेल्या काही दिवसांत आटोक्यात आला आहे. दोन दिवसांत लेप्टोचा एकच रुग्ण आढळून आला आहे. दुषित पाण्यामुळे होणार्या गॅस्ट्रोची साथ मुंबईत पसरली आहे. सात दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे २२५ रुग्ण आढळून आले आहेत. तापाच्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झालेली आहे. सात दिवसांत तापाचे २ हजार १४६ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे १७५, लेप्टोचे ११, डेंग्यूचे १७, टायफॉईडचे २५, कावीळीचे २४ तर कॉलराचे २ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)