- मयूर पठाडेम्हातारपण कुणालाच आवडत नाही, म्हातारपण जाऊ द्या, त्याची नुसती चाहुलही आपल्याला अवस्थ करते. कारण म्हातारपणाची नुसती चाहुल जरी आपल्याला लागली तर सगळचं बिनसतं. आपल्यातही निगेटिव्हीटी यायला लागते, सगळा उत्साह जातो आणि एक किरकिरेपण कायमच आपली सोबत करायला लागतं.पण अनेकदा आपलं म्हातारपण जवळ यायला लागलंय हेच आपल्याला कळत नाही. अर्थात हे म्हातारपण वयावर अवलंबून नाही. जसजसं वय वाढत जाईल, तसतसं वार्धक्याच्या खुणा तुमच्या शरीर-मनावर उमटतीलच, पण बºयाचदा अनेकांमध्ये अवेळीच म्हातारपणाची लक्षणं दिसायला लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर त्याची सवय होत जाते आणि मग आपल्या आयुष्याची पुंजी हळूहळू संपायला लागते आणि मग ती कायमची संपतेच. अगदी अकाली.ब्रिटनमधल्या काही शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. अत्यंत महत्त्वाचं असं हे संशोधन आहे. विशेषत: मध्यवयीन तब्बल सव्वाचार लाख लोकांवर त्यांनी हे संशोधन केलं.त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, आपल्या शारीरिक हालचालींकडे कायम बारीक लक्ष ठेवा. या हालचालीच तुमची तब्येत कशी आहे हे सांगतो, एवढंच नव्हे, तुमचं आयुष्य किती बाकी आहे, हेदेखील त्यावरुन कळू शकतं.कसं ओळखायचं हे?पहिल्यांदा तुमच्या हाताची ग्रिप तपासा. कुठलीही वस्तू हातात धरल्यानंतर ती तुम्हाला व्यवस्थित घट्ट पकडता येते का? कि निसटायला होते? त्यावर पकड निट बसत नाही?..आणि दुसरं.. तुमच्या हालचालीही तपासा. त्या थोड्या स्लो तर झालेल्या नाहीत ना? उठणं, बसणं, चालणं, वेगवेगळ्या हालचाली करणं.. या गोष्टी पहिल्यापेक्षा तुम्ही स्लो तर करीत नाही आहात ना?ही दोन्ही लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर तुमचं आयुष्य उताराला लागलं आहे असं समजायला हरकत नाही. तुम्हाला हृदयाचे विकारही त्यामुळे होऊ शकतात. त्यावर उपाय नाही, असं नाही, पण या गोष्टींकडे त्वरित लक्ष देऊन पुढची हानी टाळायला हवी.अशाच प्रकारचं संशोधन यापूर्वीही झालं होतं. यावेळचं संशोधन जास्त मोठ्या प्रमाणात आणि पहिल्या संशोधनावर शिक्कामोर्तब करणारं आहे. युरोपिअन हार्ट जर्नलमध्ये ते प्रकाशितही झालं आहे.
हाताची पकड ढिली आणि हालचाली मंदावल्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 13:14 IST
..आयुष्याची ‘संध्याकाळ’ जवळ आल्याची ही निशाणी आहे!
हाताची पकड ढिली आणि हालचाली मंदावल्यात?
ठळक मुद्देकुठलीही वस्तू हातात धरल्यानंतर ती तुम्हाला व्यवस्थित घट्ट पकडता येते का? कि निसटायला होते?उठणं, बसणं, चालणं, वेगवेगळ्या हालचाली करणं.. या गोष्टी पहिल्यापेक्षा तुम्ही स्लो तर करीत नाही आहात ना?ही दोन्ही लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर तुमचं आयुष्य उताराला लागलं आहे असं समजायला हरकत नाही.या गोष्टींकडे त्वरित लक्ष देऊन पुढची हानी टाळायला हवी.