शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित
-अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा : शासनाने केली १५.११ कोटींची तरतूद

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत प्रवासाचा लाभ सिकलसेलग्रस्तांना मिळावा म्हणून शासनाने १५.११ कोटींची तरतूद केली खरी, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिकलसेलचे रुग्ण या लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समस्येसोबतच सिकलसेलग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सिकलसेल केंद्र नागपूरला हलवावे, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी केली आहे.
रामटेके यांना माहितीच्या अधिकाऱ्यात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पये सिकलसेलग्रस्तांना दिले आहेत. यात आदिवासी विभागाने १२.५६ कोटी, सामाजिक न्याय विभागाने १.८८ कोटी रु पये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने ०.६६ कोटी रु पये दिलेले आहेत. परंतु ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच करण्यात आलेली नाही.
सिकलसेल आजाराची जागतिक स्तरावर गंभीर आजारांमध्ये नोंद आहे. सिकलसेल रु ग्णांवर नेहमी मृत्यूची तलवार टांगलेलीच असते, अशा रु ग्णांचा जीव वाचवणारे औषधोपचार फक्त शासकीय जिल्हा रु ग्णालये किंवा शासकीय वैद्यक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहेत. विशेषत: या आजाराचे रुग्ण मुख्यत्वे खेड्यापाड्यात, आदिवासी व मागासवर्गीयात आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून गेल्या १४ वर्षांपासून एस.टी. बस प्रवास भाड्यात सवलत मिळावी म्हणून रामटेके प्रयत्नशील होते. त्यांनी आंदोलनेही केली. अखेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या रु ग्णांना एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवासाची सवलतीची घोषणा केली. २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पयांची तरतूदही करण्यात आली. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच केली नाही. परिणामी नागपूरसह विदर्भातील अडीच लाख सिकलसेलग्रस्त या लाभापासून वंचित राहिले आहेत.
-रुग्णांना दिलासा द्यावा
रामटेके यांनी सांगितले, माजी मुख्यमंत्र्यांकडून मोफत एस.टी. प्रवासाची सवलतीची घोषणा झाल्यानंतर नियमावली बनविण्यासाठी मुंबईत एनआरएचएमद्वारे आमंत्रितही करण्यात आले होते. आता आर्थिक बजेट आहे तेव्हा शासनाने परिपत्रक काढून रु ग्णांना दिलासा द्यावा, तसेच या वर्षी उरलेला निधी पुढील वर्षीच्या खर्चासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी आहे.