शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरणारे हे आहेत ‘सहा’ आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 18:28 IST

काही शारीरिक आजार आपल्या ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंद हिरावला जातो. यामुळे आरोग्यदायी व आनंददायक सेक्सचा अनुभव घेण्यासाठी या ‘सहा’ शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करु नये.

-Ravindra Moreआयुष्याचा परिपूर्ण आनंद घेत असताना त्यात ‘सेक्शुअल’ आनंदही खूप महत्त्वाचा आहे. मात्र काही शारीरिक आजार आपल्या ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंद हिरावला जातो. यामुळे आरोग्यदायी व आनंददायक सेक्सचा अनुभव घेण्यासाठी या ‘सहा’ शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करु नये. कंबरदुखी : बदलत्या जीवनशैलीमुळे कंबरदुखीचा त्रास बहुतेकजणांना सतावत आहे. कंबरदुखीमुळे सेक्स लाईफवर परिणाम होत नसला तरीही हा सेक्स लाईफमधील एक अडथळा ठरू शकतो. पाठीच्या कण्याचे दुखणे व विकार यामुळे सेक्स करण्यास त्रास होऊ शकतो. एका अभ्यासानुसार असे सामोरी आले आहे की, ६१ टक्के लोकांनी पाठीच्या दुखण्यामुळे सेक्स करणे टाळले आहे. जर तुम्हाला सौम्य स्वरुपातील पाठीचे दुखणे असेल तर वेळीच योग्य व्यायामाने त्यावर मात करा.अ‍ॅनमिया : अ‍ॅनिमियाचा तसा तुमच्या सेक्स लाईफवर थेट परिणाम होत नाही, मात्र यामुळे तुम्हाला थकवा किंवा सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. विशेषत : पुरुषांमध्ये अ‍ॅनिमियामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते. मात्र जीवनशैलीतील काही बदलांमुळे या समस्येवर उपाय करणे शक्य आहे.मोनोपॉज: मोनोपॉजच्या काळात स्त्रीयांच्या शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांमधील सेक्स करण्याची इच्छा कमी होते. या ट्प्प्यात स्त्रीयांची सेक्सलाईफ मधील रुची, पुनरावृत्ती व वेदना तुलनेत कमी होतात. मात्र योग्य समुपदेशनाने आरोग्यदायी सेक्स लाईफ परत मिळवणे शक्य आहे.रक्तवाहिन्यांचे विकार : पुरुषांमध्ये शिश्नाच्या ताठरतेवर त्यांचे लैंगिक सुख अवलंबून असते. मात्र जननेद्रियांना रक्त पुरवठा करणार्याश वाहिन्यांमध्येच काही बिघाड झाल्यास त्याचा परिणाम सेक्स लाईफवर होतो.नैराश्य : तुमच्या मेंदुतून सेक्सबद्दलची भावना निर्माण न झाल्यास तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. जर मेंदूतून संकेत देण्याची प्रकिया मंदावली तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही ताण, भीती किंवा नैराश्याने पिडित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्सलाईफवर देखील होतो.मधुमेह: रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण सेक्स लाईफमध्ये अनेक अडथळे निर्माण करू शकते. ६० ते ७० मधुमेही पुरुष, या विकारामुळे शिश्नाची ताठरता राखू शकत नाहीत. मधुमेहामुळे शिश्नाला होणारा रक्तपुरवठा बाधित होतो. परिणामी शिश्नाला संतुलित करणार्याई नसींना योग्य संकेत न मिळाल्याने ताठरता राखता येत नाही.