शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी व्हायला पैसे थोडीच लागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:04 IST

करुन पाहा हे सोप्पे आठ उपाय आणि घ्या जीवनाचा आनंद नव्यानं.

ठळक मुद्देसकारात्मक विचाराच्या लोकांसोबत राहा.इतरांना मदत करा.स्वत:तल्या चांगल्या गोष्टी शोधा.कोणतीही जबाबदारी घ्या आणि ती तडीस न्या.

- मयूर पठाडेआपल्या आजूबाजूचं वातावरणच बºयाचदा असं असतं की, नकारात्मक विचारांनी आपलं मन पूर्णत: व्यापलेलं असतं. नेहमी हसत राहा, प्रसन्न राहा, काळजी करू नका.. त्यानं तुमच्या वर्तमानात काहीही फरक पडणार नाही.. आता हे काही आपल्याला माहीत नाही असं नाही. पण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक ताणांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अशावेळी नकारात्मक विचारांपासून दूर राहावं तरी कसं?..अनेकांना हा प्रश्न पडतो, पण लक्षात ठेवा त्यावरही उपाय आहेत. नकारात्मक विचारांनी काहीच होणार नाही, झालंच तर आपलं टेन्शन आणि डोकेदुखी तेवढी वाढेल, हे तुम्हालाही माहीत आहे.. मग करुन पाहा या गोष्टी. त्यानं तुमचं टेन्शनही कमी होईल आणि नकारात्मक गोष्टीही दूर पळतील.कसे घालवाल नकारात्मक विचार?१- सकात्मक विचारांच्या, कायम प्रफुल्लित दिसणाºया लोकांच्या, तशाच प्रकारच्या आपल्या मित्रमंडळींसमवेत, कुटुंबियांसमवेत राहाण्याचा प्रयत्न करा. त्यांची सकारत्मकता तुम्हालाही प्रफुल्लित करील२- ध्यानधारणा किवा योगाचा आधार घ्या. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि मुख्य म्हणजे वर्तमानात राहायला त्यामुळे मदत होईल.३- ताणातही हसणं, हसत राहाणं अवघड आहे, असं कोणीही म्हणेल, पण करुन तर पाहा, अगदी आर्टिफिशिअल हसण्यानंही फायदा होतो हे संशोधनांतून सिद्ध झालं आहे.४- नकारात्मक विचार आपल्याला गाठणार नाहीत, यासाठी कायम सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तरीही नकारात्मक विचार येतीलच, पण त्यांचं प्रमाण खूपच कमी होईल एवढं नक्की.५- कुठल्याही गोष्टीची स्वत:हून जबाबदारी घ्या. एकदा का अशी जबाबदारी घेतली की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण स्वत:हून करतो. त्यात गुंतल्यामुळे इतर गोष्टींवरचा, नकारात्मक वेळ आपोआपच दूर जातो.६- अगदी काहीच नाही, तर इतरांना मदत करा. कोणत्याही गोष्टीत. घरी आईला, बायकोला, बहिणीला, रस्त्यावरच्या कुणा गरजूला, आॅफिसात.. ही मदत किती का किरकोळ असेना, पण ती नक्की तुमच्या मनांत आनंदी विचारांची रुजवात करील.७- आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगातला कोणताच माणूस परफेक्ट नाही. कोणालाही कोणत्याही भावभावना आणि नकारात्मकता चुकलेली नाही. प्रत्येकालाच त्या चक्रातून जावं लागतं. त्यामुळे त्याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही. खांदे झटका आणि पुन्हा कामाला लागा. बघा, काय फरक पडतो ते.८- भले नकारात्मक विचारांनी तुम्ही भारलेले असाल, पण एक गोष्ट करा, आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत त्याचाही एकदा विचार करा. थेट लिहूनच काढा ना ते.. तुमच्या लक्षात येईल, रडत, कुढत बसण्यापेक्षा करायच्या अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत.