शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

HEALTH : उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 16:57 IST

आपल्या देशातच पूवार्पार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत करतील. जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीराला गारवा मिळेल.

-Ravindra moreउन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून बरेचजण काही ना काही उपाययोजना करताना दिसतात, त्यात जास्त भर रस्त्यावरील शितपेयांना दिले जाते. मात्र कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या या शितपेयांचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. मात्र आपल्या देशातच पूवार्पार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत करतील. जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीराला गारवा मिळेल.  * दहीदही आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे कधीचे सिद्ध झाले आहे. उन्हाळ्यात तर दहीचे सेवन आवर्जून करावे. कारण बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असतो. या समस्यांसाठी दही खाणं अगदी उपयुक्त ठरते. शिवाय दहीभाताचा आहारात समावेश असणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.* गुलकंद गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारे गुलकंद हा उन्हाळ्यातील आणखी एक अप्रतिम पदार्थ! उन्हाळ्याच्या दिवसातही चेहऱ्यावरची तकाकी तशीच ठेवण्याचं काम गुलकंद सहज करू शकतो. सकाळी उठल्यावर एक चमचा अथवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास या दिवसात फायदेशीर ठरतं.* सब्जाअगदी पूर्वीच्या काळापासून भारतातील अनेक घरांमध्ये फालुदा, ताक, खीर अशा पदार्थांमध्ये सब्जा आवर्जून घातला जातो. तत्काळ थंडावा मिळण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे. ग्लासभर पाण्यात भिजवलेला सब्जा घालून ते पाणी पिणं वजन घटवण्यासाठीही अतिशय उपयोगी आहे.* आंबा  खाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजवून ठेवावा. जसा चवीला चांगला तसाच संपूर्ण शरीरयंत्रणेत लगेच सुसूत्रता आणून देण्यासाठीही आंबा मदत करतो. अनेकांना ठाऊक नसलेली आणखी एक गोष्ट अशी, की आंबा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.* नारळ पाणीसोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी त्वचेला तजेलदार ठेवण्यास अतिशय फायद्याचं आहे. सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय होय.* जिरेया मसाल्याच्या पदार्थांमधील घटकाचा, उन्हाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या गुणांबद्दल अनेकांना माहीत नसतं. मेद कमी करण्यास मदत करणं, नसांना आराम देणं या गोष्टी जि?्याचा सेवनाने साध्य होतात. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळाल्याचं तुम्हाला सहज जाणवेल.* माठातलं पाणी एक मातीचा माठ, एक मलमलचं कापड आणि खस-खसचा पाला यापासून तुम्ही थंडावा मिळेल असं पेय तयार करू शकता. मडक्याच्या तळाशी खस-खसचा पाला टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा. सच्छिद्र माठ आणि खस-खसमुळे शरीराला थंडावा मिळतो.* काजूगर संझ्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असलेले काजूगर फॅट्स कमी करण्यासाठी फायद्याचं आहे. हे रसाळ फळ उन्हाळ्यात खाणं नक्कीच फायदेशीर आहे* ज्वारीशरीराला आवश्यक असलेला थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता ज्वारीत आहे. व्हिटॅमिन बी१, लोह आणि फायबर यांचं भरपूर प्रमाण असलेली ज्वारी वजन नियंत्रणास मदत करते. बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित राखण्यास नक्कीच मदत होईल.* कोकम सरबत तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म असलेलं कोकम लठ्ठपणावर मात करायला मदत करतं. या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारं कोकम सरबत, कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासही मदत करत असल्याने ते आवश्य खावं