शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एक श्वास, जो क्षणाक्षणाला वाढवील तुमचं आयुष्य..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:58 IST

खोटं नाही.. करून पाहा, अनुभवा आपल्यातला बदल..

ठळक मुद्देआत्मविश्वास वाढेलशरीरातील विषारी घटक बाहेर पडतीलव्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसेल

- मयूर पठाडेअनेकदा आपल्याला होणाºया त्रासाचा उपाय आपल्याकडेच असतो. त्यासाठी फार कुठे जावं लागत नाही किंवा आटापिटाही करावा लागत नाही. पण आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचं मोल आपल्याला नसतं हेच खरं..दीर्घ श्वास..किती सोपी गोष्ट..पण करतो का आपण ते? नाहीच. कारण त्याचं महत्त्वच आपल्याला माहीत नाही आणि पुन्हा कोणत्याही गोष्टीला लेबल लावण्यात आपण पटाईत असतो. ही गोष्ट ना, काय बोगस.. ती ना.. त्यात तर काही अर्थच नाही..एकदा का असे लेबल कोणत्याही गोष्टीला चिकटवले गेले की मग ती करून पाहायची शक्यता तर मग आणखीच दूर जाते..पण दीर्घ श्वासासारखी अगदी लहानशी गोष्ट.. ती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. आनंदी आणि हेल्दी जीवन जगण्याची ती एक अतिशय सोपी आणि पहिली पायरी आहे.तुम्ही म्हणाल, दीर्घ श्वासानं असं होतं तरी काय?..आता याबाबत कोणत्या तज्ञान काय म्हणून ठेवलंय, त्याला विज्ञानाचा काय पुरावा आहे, यातलं काहीदेखील मी तुम्हाला सांगणार नाही. फक्त तुम्ही करून बघा..खाली दिलेले फायदे जर तुम्हाला स्वत:त दिसले नाहीत, पहिल्यापेक्षा तुमच्या आचार, विचारांत आणि आरोग्यांत बदल झाला नाही तर मग ही कृती करायची की नाही, याचा निर्णय घ्यायला, त्याला कुठलं लेबल लावायला तुम्ही मोकळे..बघा करून..

दीर्घ श्वासाचे फायदे..१- दीर्घ श्वासामुळे तुमच्या मनाला शांतता मिळते. तुम्हाला छळणाºया विचारांचा कलकलाट थांबतो आणि एक प्र्रकारची स्थिरचित्तता तुम्हाला लाभते.२- तुमच्या शरीरातील विषारी घटक दीर्घ श्वासातून बाहेर पडतात. असंही आपल्या शरीरातील आपल्याला अपायकारक असलेले सुमारे ७० टक्के श्वासावाटे बाहेर पडतात. दीर्घ श्वासनामुळे ही प्रक्रिया सुदृढ आणि वेगवान होईल.३- आपल्याला जर कुठल्या वेदना होत असतील तर त्या कमी होतील आणि होणाºया वेदनांचं प्रमाणही कमी असेल. दीर्घ श्वसनामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिनचं प्रमाण वाढतं. हे एन्डॉर्फिन म्हणजे आपल्या शरीरातील नॅचरल पेनकिलर आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या वेदना ते शमवतं.४- दीर्घ श्वसनामुळे आपला मूड चांगला होतो. मूड स्विंगचे प्रकार होतात, तेही कमी होतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी याचा फार मोठा फायदा होतोे.५- तुमच्या शरीराची ठेवणही यामुळे सुधारते. बºयाचदा आपण बसताना कुबड काढून बसतो, उभे राहतानाही खांदे पाडलेले असतात. दीर्घ श्वसनामुळे तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.६- तुमच्या हृदयाची क्षमताही दीर्घ श्वसनामुळे वाढते, जी तुम्हाला हृदयविकारासारख्या घातक आजारांपासून लांब ठेऊ शकते.७- प्रत्येक क्षणाला आपण जो श्वास घेतो, तो प्रत्येक क्षण तुम्हाला दीर्घायू करू शकतो.