शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील युवकाची इस्रोत भरारी

By admin | Updated: February 23, 2017 00:29 IST

तालुक्यातील बेरडीपार (खुर्शीपार) येथील रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे या युवकाची नुकतीच इस्रोत निवड झाली आहे.

वडेगावच्या शाळेत शिक्षण : होतकरूंना मार्गदर्शन व देशकार्य करण्याची इच्छा तिरोडा : तालुक्यातील बेरडीपार (खुर्शीपार) येथील रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे या युवकाची नुकतीच इस्रोत निवड झाली आहे. त्याने आपल्या गावातील होतकरु तरुणांना मार्गदर्शन व प्रसंगी आर्थिक मदत तसेच देशासाठी कार्य करण्याची इच्छा बोलून दाखविली. भारतामध्ये इसरो ही नामांकित संघटना (इंडियन स्पेश रिसर्च आॅरगनायझेशन) भारतीय अवकाश संशोधन संघटना आहे. रोशनचे बालपण खेड्यातच गेले. त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या स्वगावी पूर्व माध्यमिक शाळा बेरडीपार येथे तर आठवी ते दहावीपर्यंत भिवरामजी विद्यालय वडेगाव येथे शिक्षण घेतले. दहावीला ७६ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाला. अकरावीला भिवरामजी ज्यु. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीमध्ये ५६ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाला. घरच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव असल्याने समोरील शिक्षणाकडे न वळता आयटीआयला जाण्याचा निर्णय घेतला. ड्रॉप्समन मेकॅनिक या दोन वर्षीय ट्रेडसाठी गोंदियात प्रवेश घेतला व उत्कृष्टरित्या अभ्यास करुन उत्तीर्ण झाला. त्यानंतर एक वर्ष मेगल न्युमेटिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे अप्रेंटिशिप केले. याच काळात इसरोची ड्रॉप्समन टेक्नीशियनसाठी जाहिरात निघाली. संपूर्ण भारतातून सात जागा होत्या. त्यात ३ सर्वसाधारण, २ इतर मागासवर्ग व २ अनुसूचित जातीकरिता राखीव होते. लेखी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यात रोशन ओबीसी गटातून भारतातून प्रथम तर सर्वसाधारण गटातून द्वितीय आला. त्यामुळे सर्वसाधारण प्रर्वगातून निवड करण्यात आली. रोशनने समोरील शिक्षण चालूच ठेवून घेवून स्वत: वैज्ञानिक बणण्याचे ध्येय्य बोलून दाखविले. रोशनचे आई-वडील शेतमजुरी करीत असून फक्त दीड एकर शेती असल्याचे सांगितले. तीन बहिणी असून त्यांचेही सहकार्य मिळत असते. हे माझे सौभाग्य आहे की माझी निवड झाली. मी तिथे गेलो आणि रॉकेटद्वारे १०४ उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. त्यात युएसए ९६, भारत ३, इस्राईल -१, कजाकीस्थान १, स्वीझरलेंड १, युएई १, नेदरलैंड १ असे १०४ उपग्रह अंतराळात पाठविले. त्यावेळी आम्ही वैज्ञानिकसह बंगलोरला पडद्यावर लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो. सुरुवातीला कठीण वाटत होते. इंग्रजी व कन्नड भाषेचा वापर होतो. ती भाषा आता मी शिकत आहे. माझ्या गावातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करणार. स्पर्धा परीक्षेसाठी, जाण्यासाठी, पुस्तकांसाठी प्रसंगी आर्थिक मदतसुद्धा करणार. लहाणपणीच फार मोठे व्हायचे असे वाटायचे, पण नेमके काय व्हायचे हे ठरविले नव्हते. पण जसजसा मोठा झालो तसतशी इच्छा जागृत होवून त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील प्राचार्य व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याने निवडीचे श्रेय आई प्रमिला, वडील भक्तप्रल्हाद टेंभरे, आयटीआयचे शिक्षक, भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील प्राचार्य व शिक्षक तसेच पूर्व माध्यमिक शाळा बेरडीपार येथील शिक्षकांना दिले आहे. निवडीबद्दल सतत मेहनत, चिकाटी व अभ्यास कामात आले असून खेड्यातील युवक सुद्धा आपली प्रगती करु शकतात. त्यासाठी युवकांनी आत्मविश्वास निर्माण करुन आपली स्वत:ची प्रगती करावी, असे आवाहन सुद्धा रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी) शाळेत झालेल्या सत्काराने मन भारावले नियुक्तीच्या ठिकाणी सेटेलाईटचे (उपग्रहाचे) लहानलहान भाग व असेंबल, जोडणीचे ड्रार्इंग काढणे, मॉडेल बनविणे, त्यांची हालचाल करवून प्रत्यक्षात पाहणे, जोडणी करुन काम करेल किंवा नाही याबाबत तपासणी करणे, हे कार्य करावे लागत आहे. माझी नियुक्ती २७ डिसेंबर २०१७ ला बँगलोर येथील इसरोमध्ये झाली असून पहिला पगार झाला. त्यात घरी आई-वडिलांना देवून त्यातील पैशानेच मिठाई खरेदी करुन मी माझ्या गुरुजनांना मिठाई देवून गोड बातमी दिली. शाळेच्या वतीने केलेल्या सत्काराने मन भारावून गेल्याचे तो म्हणाला.