सालेकसा तालुक्यात सर्वाधिक खोल : तिरोड्यात सर्वाधिक वरगोंदिया : मागील दोन-तीन वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने धरणे कोरडेच राहत आहेत. जिल्ह्यातील मामा तलाव व इतर तलावांची दुर्दशा असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी दरवर्षी पाण्याची पातळी खोल-खोल जात आहे. जिल्ह्याची सरासरी पाण्याची पातळी ५.८ मिटरवर आहे. मागील ५ वर्षाच्या तुलनेत पाण्याची पातळी मोजण्यात आल्याने मागच्यावर्षी आमगाव तालुक्याची पाण्याची पातळी ८.५४ मिटर होती. परंतु यंदा ९.७२ मिटर आहे. १.१७ मिटरने पाण्याची बातळी खाली गेली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.८९ होती. परंतु यंदा ८.७९ मिटर आहे. म्हणजेच ०.९१ मिटरने खाली गेली आहे. देवरी तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ८.४९ होती. परंतु यंदा ८.९४ मिटर आहे. म्हणजेच ०.४५ मिटरने खाली गेली आहे. गोंदिया तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.६६ होती. परंतु यंदा ८.७१ मिटर आहे. म्हणजेच १.०५ मिटरने खाली गेली आहे. गोरेगाव तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.७९ होती. परंतु यंदा ९.२८ मिटर आहे. म्हणजेच १.४९ मिटरने खाली गेली आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ९.५५ होती. परंतु यंदा १०.३५ मिटर आहे. म्हणजेच ०.८० मिटरने खाली गेली आहे. सालेकसा तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी १०.३८ होती. परंतु यंदा १०.७१ मिटर आहे. म्हणजेच ०.३३ मिटरने खाली गेली आहे. तिरोडा तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ६.८४ होती. परंतु यंदा ७.०९ मिटर आहे. म्हणजेच ०.२५ मिटरने खाली गेली आहे. परवानगी न घेताच खोदल्या जातात बोअरवेलशासनाच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला बोअर करायची असल्यास २०० फुटापर्यंत बोअर करायची असते. बोअरवेल खोदण्यासाठी गावातील पाणी पुरवठा समितीची मंजुरी घेण्याची गरज असताना बोअरवेल खोदण्यासाठी गावातील पाणी पुरवठा समितीची परवानगी घेतली जात नाही. शासनाने २०० फूटापर्यंतच बोअरवेल खोदण्याची परवानागी दिली, मात्र अनेक लोक ३०० ते ३५० फूट खोल बोअरवेल खोदत आहेत.
जिल्ह्याच्या पाण्याची पातळी ५.८ मिटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:16 IST