शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीसाठी ट्रॅक्टरकडे कल

By admin | Updated: June 8, 2015 01:32 IST

आधुनिक युगात यांत्रिक प्रगती झाल्यामुळे आता शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस बैल जोड्यांची संख्या कमी होत आहे.

यांत्रिक प्रगती : जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या बिकट गोंदिया : आधुनिक युगात यांत्रिक प्रगती झाल्यामुळे आता शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस बैल जोड्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच एकेकाळी प्रसिद्ध असलेले बैल बाजारही आता मोडीत निघालेले दिसत आहे.पूर्वी शेतकरी सालगडी भल्या पहाटे उठून ऊन डोक्यावर येईपर्यंत शेतात नांगरणी- वखरणी करीत होते. दुपारनंतर ऊन्ह ओसरल्यानंतर पुन्हा दुपारनंतर शेतीची मशागत करण्यात ते गुंग होऊन जात होते. कडक उन्हाळ्यात शेतीची मशागत करण्यासाठी शेतकरी सर्ज्या-राज्यासोबत घाम गाळत होते. आताही अनेक शेतकरी बैलजोडीचा वापर करतात. रखरखत्या उन्हात आपल्या ढवळ्या-पवळ्यासोबत ते नांगरणी-वखरणी करतात. उन्हामुळे त्यांच्या जीवाची लाहीलाही होते. मात्र मशागत करणे अतिआवश्यक असल्याने त्याची तमा न बाळगता ते शेतात राबतात. त्याशिवाय काळ्या आईच्या अंगावर हिरवा शालू पांघरणे अशक्य असते. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आले आहे. आधुनिकीकरणामुळे शेतीही आता आधुनिक झाली आहे. परिणामी शेती मशागतीची कामे आधुनिक यंत्राच्या सहाय्याने करण्यास सुरूवात झाली आहे. पूर्वी नांगरणी-वखरणीसाठी बैलजोडीशिवाय काम भागत नव्हते. आता हिच कामे ट्रॅक्टरने केली जातात. त्यामुळे मशागत त्वरित पूर्ण होण्यास मदत मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांना वैरण मिळत नसल्याने पाळीव जनावरांची विक्रीही वाढली आहे. सोबतच दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेणे परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे आता बैलांनी मशागत करणे शेतकऱ्यांना अवघडही जात आहे. शेती कामासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. मोठ्या शेतकऱ्यांना जोमाने शेती करताना अनेक दिवस लागतात. (प्रतिनिधी)