शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट

By admin | Updated: January 14, 2017 01:18 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे

यावर्षी भाव स्थिर : तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. त्यामुळे संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. अशात यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते. ‘तिळ-गुळ खा अन् गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तिळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे. संक्रात आली की तीळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता शनिवारी (दि.१४) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते. हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे. (शहर प्रतिनिधी) रेडिमेड पापडीही उपलब्ध ४आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडिमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडिमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तीळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडिमेड पापडीकडे असतो. नेमकी ही बाब हेरून बाजारात रेडिमेड पापडी उपलब्ध करण्यात आली आहे. २४० रूपये किलो दराने पापडी सध्या विकली जात आहे. तीळ-गुळाचे औषधीयुक्त लाभ ४मकर संक्रांत येते तेव्हा शिशिर ऋतू शेवटच्या टप्यात असतो. थंडीत शरिरात कफ वाढून जमा होतो. तसेच वाताचा त्रासही असतो. आयुर्वेदानुसार तीळ हे सर्वाेत्कृष्ट स्नेह द्रव्य असल्याने त्याच्या जोडीला गुळ दिल्यास कफाच पचन होऊन वाताच समन होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या वसंत ऋतूतील ऋतूजन्य (सिजनल व वायरल) आजारांचा त्रास होत नाही. त्यामुळेच संक्रांतीत तीळ-गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांी सुरू केल्याचे वैद्य अपर्णा कमलापती खोब्रागडे यांनी सांगीतले. १०० ते १३० रुपये भाव ४गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १३० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४०-५० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर असेच होते. चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव स्थिर दिसत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक चांगलीच खरेदी करीत असल्याचेही चुलोद येथील विक्रेते श्रावण वंजारी यांनी सांगितले.