शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकासोबत नगदी पिके घ्या

By admin | Updated: January 17, 2016 01:36 IST

शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

चांदेवार यांचे प्रतिपादन : शेतकरी प्रशिक्षणात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ुेबोंडगावदेवी : शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पुरेशा जलसिंचनाच्या सोयी-सुविधा नसल्याने एका पाण्याअभावी हाती येणाऱ्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागते. धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाल्याने धानाचे पीक शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जपाशातून मुक्ती मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्यानेच येणाऱ्या दिवसात शेती फायदेशीर ठरणार असल्याचे उद्गार मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार यांनी काढले. आसोली येथील शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी आसोलीचे सरपंच मुरलीधर रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून टिकाराम नाकाडे, दुधराम नाकाडे, पोलीस पाटील भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे, सखाराम नैताम उपस्थित होते. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी आर.के.चांदेवार, कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर, कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी, भारती येरणे यांची उपस्थित होते. कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षणाला शेतकऱ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पुढे चांदेवार म्हणले, आजच्या वाढत्या महागाईत धानाची शेती परवडण्याजोगी नाही. काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असून सुध्दा फक्त भातपिकाचीच लागवड होते. भाताच्या पिकावर अवलंबून न राहता ऊस, केळी, मका अशी नगदी पिकांकडे वळून प्रयोगशिल व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करावा नवनवीन पिके घेण्यासाठी शेड-नेट हाऊस, पॅक हाऊस तयार करणे काळाची गरज आहे. कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर म्हणाले, जमीनीमधील माती नमूना कसा काढावा, माती नमूना तपासणीची गरज का? याची विस्तृत माहिती दिली. श्री पध्दत लागवड तंत्रज्ञान किड व रोग यातील फरक त्यावरील नियंत्रण, गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सधन भात पिक प्रात्यक्षिक प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या निविष्ठाचे त्यांनी वाचन केले. शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती दिली. भारती येरणे यांनी कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांची माहिती दिली. आसोली हे गाव प्रकल्पासाठी घेण्यात आले होते. यावेळी टिकाराम नाकाडे, भोजराज नाकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प राबविण्यात आला. संचालन पी.एम.सूर्यवंशी यांनी तर आभार आर.एच.मेश्राम यांनी मानले. आयोजनासाठी कृषी मित्र पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, यशवंत गणविर, नामदेव पर्वते यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)