शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

लिंबा व तेढा ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती

By admin | Updated: August 10, 2015 01:26 IST

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून तालुक्यातील ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण एकदाच नव्हे, तर दुसऱ्यांदाही दोषपूर्ण पद्धतीने काढण्यात आले.

न्यायालयाचे आदेश : तहसीलदाराने काढले चुकीचे आरक्षणगोरेगाव : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून तालुक्यातील ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आरक्षण एकदाच नव्हे, तर दुसऱ्यांदाही दोषपूर्ण पद्धतीने काढण्यात आले. दरम्यान, ही बाब तहसीलदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी अडेलपणाचे धोरण अवलंबून निवडणुकीचे नियम वेशीवर टांगून सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. या बाबीला कंटाळून तेढा व लिंबा गाववासीयांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दि.६ च्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगनादेश दिला. यामुळे लिंबा व तेढा येथील सरपंचपदाची निवडणुक स्थगित करण्यात आली. तहसीलदाराच्या हेकेखोरपणामुळे सरपंचपदाची निवडणूक वांद्यात आल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरावरून उमटू लागली आहे. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण एक महिन्यापूर्वी काढण्यात आले होते. दरम्यान आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप घेण्यात आले. हे आक्षेप मान्य करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्यांदा आरक्षणाची सोडत काढण्याचे निर्देश दिले. यानुरूप ३१ जुलै रोजी तहसीलदार बाम्बोर्डे यांनी दुसऱ्यांदा ५५ ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाची सोडत काढली. सन २००५ मध्ये ज्या १९ ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण होते त्या ग्रामपंचायतींना आताच्या ५० टक्के महिला आरक्षणातून वगळणे गरजेचे होते. परंतु तहसीलदार बाम्बोर्डे यांनी तसे न करता हिरडामाली, लिंबा, झांजिया, भडंगा, तेढा, मोहगाव बु. या ग्रामपंचायतींचा पुन्हा महिला आरक्षणात समावेश केला. दरम्यान डॉ.विवेक मेंढे यांनी यावर आक्षेप घेतला. परंतु आक्षेपाला मान्य केले नाही. यानंतर मेंढे यांनी या विषयावर लेखी पत्र देऊन आक्षेप घेतला. असे असले तरी आरक्षण सोडतीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीच्या अहवालात आक्षेप घेण्यात आले नाही, असे नमूद केले. एवढेच तर लगबगीने सरपंचपदाची निवडणूक घेण्याच्या उद्देशाने निवडणूक नियम वेशीवर टांगून प्रक्रिया सुरू केली. नियमानुसार ७२ तासांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीच्यासंदर्भात लेखी सूचना, पत्र देणे गरजेचे असते. मात्र तहसीलदारांनी अवघ्या १२ ते २४ तास शिल्लक असताना सूचनापत्र सदस्यांनी हाती दिले. यामुळे पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत काही ग्रामपंचायतींच्या सदस्यांना यावर आक्षेप घेता आले नाही. मात्र, दोषपूर्ण आरक्षणाच्या सोडतीवर तेढा येथील डॉ. विवेक मेंढे यांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. न्यायालयाने मेंढे यांची सर्व बाजू तपासून आरक्षणाची सोडत नियमानुसार करण्यात यावी, असे निर्देश देऊन सरपंचपदाची निवडणूक तूर्त स्थगित करण्यात यावी, असे आदेश दिले. यानुरूप गोरेगाव तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकी पैकी तेढा व लिंबा या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. या दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंचपदाची निवडणुक वांद्यात आली आहे. तहसीलदार बाम्बोर्डे यांच्या अडेलतट्टूपणामुळे निवडणूक प्रक्रिया व अन्यायपूर्ण आरक्षण जाहीर केल्याने अडकले असल्याचा आरोप सर्वस्तरावरून केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)हे कृत्य तहसीलदाराचे : विवेक मेंढेजिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे आरक्षणाची सोडत काढली त्याच धर्तीवर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढायला हवी होती. मात्र, आरक्षणाच्या सोडतीचे नियम वेशीवर टांगून आरक्षण जाहीर करण्यात आले. दरम्यान तहसीलदारांच्या निर्देशनास ती चूक आणली. मात्र त्यांनी चुक मान्य केली नाही. परिणामी या दोन ग्रामपंचायतींना सरपंचपदाच्या निवडणुकीपासून मुकावे लागले. यासाठी तहसीलदार बाम्बोर्डे जबाबदार आहेत. असा आरोप काँग्रेसचे महासचिव डॉ.विवेक मेंढे यांनी केला आहे.