शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

विद्यार्थ्यांना मराठी अंकज्ञान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:48 IST

प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात १२९१ मराठी शाळा : इंग्रजीच्या १७६, हिंदीच्या २०५, बंगालीच्या सात तर उर्दूच्या दोन शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात एखाद्या अंकाला मराठीत आणि इंग्रजीत कसे वाचतात यावर विचारले असता, अनेक विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिलीत परंतु अनेक विद्यार्थ्यांना ते अंक मराठीत सांगताच आले नाही. त्यामुळे मराठीवर इंग्रजी भाषा वरचढ होत असल्याचे जाणवते.गोंदिया जिल्ह्यात एक हजार ६८१ शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एक हजार २९१ शाळा आहेत. हिंदी माध्यमाच्या २०५ शाळा, इंग्रजी माध्यमाच्या १७६ शाळा, तर उर्दूच्या दोन शाळा आहेत. आमगाव तालुक्यात हिंदीच्या १४ शाळा, मराठीच्या १३२, इंग्रजीच्या १३ अशा १५९ शाळा आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बंगालीच्या सात शाळा, हिंदीच्या सात शाळा, मराठीच्या १८८, इंग्रजीच्या १६ अशा २१५ शाळा आहेत. देवरी तालुक्यात मराठीच्या १९८, इंग्रजीच्या नऊ अशा २०७ शाळा आहेत. गोंदिया तालुक्यात हिंदीच्या ११० शाळा, मराठीच्या २१६, उर्दू दोन, इंग्रजीच्या ८७ अशा ४१५ शाळा आहेत. गोरेगाव तालुक्यात मराठीच्या १४३, इंग्रजीच्या १६ अशा १५९ शाळा आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात मराठीच्या १६० तर इंग्रजीच्या ११ अशा १७१ शाळा आहेत.सालेकसा तालुक्यात हिंदीच्या ७७ शाळा, मराठीच्या ६६, इंग्रजीच्या १२ अशा १५५ शाळा आहेत. तिरोडा तालुक्यात मराठीच्या १८८, इंग्रजीच्या १२ अशा २०० शाळा आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव व गोंदिया हे तीन तालुके मध्यप्रदेश राज्याला लागून असल्यामुळे या तीन पैकी आमगाव तालुका वगळता दोन तालुक्यातील बहुतांश शाळा हिंदीच्या आहेत. परंतु सालेकसा आणि गोंदिया हे दोन तालुके वगळता हिंदीचा प्रभाव जिल्ह्यात दिसून येत नाही. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक तालुक्यात सतत वाढत आहे. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करून इंग्रजी माध्यमाकडे पालकांचाही कल आहे. परंतु भाषेवर प्रभूत्व मिळविण्यासाठी मायबोली जपण्याचा खटाटोप दिसून येत आहे.मराठी शिकविणाऱ्या शाळांची भौतिक सुविधा अपुरीमराठीत शिक्षण देणाऱ्या शाळा फक्त जिल्हा परिषदेच्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाहिजे तशी भौतिक सुविधा नाही. शासनही मराठी शाळांकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आजही जिल्हा परिषद शाळांच्या ६७८ वर्गखोल्या जिर्णावस्थेत आहेत. यातून कधी अप्रिय घटना घडणार याचा नेम नाही. अशात अपघात होऊ नये म्हणून वर्ग ग्रामपंचायत इमारत किंवा खुल्या जागेत घेतले जातात.