शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जमिनीतील पोषक तत्त्वे होताहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:16 IST

आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. किमान १० वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ््या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होता. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होती.

ठळक मुद्देरासायनिक खताचा परिणाम : पशुपालन नामशेष अन् शेण खताकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. किमान १० वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ््या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होता. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होती.शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेत जमिनीतील पोषक तत्त्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्त्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहात होता. पीक कसदार होत होते. त्यामुळे मनुष्यालाही पौष्टीक अन्न मिळत होते.शेणखतामुळ शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते. विशेष म्हणजे ते सर्व कसदार राहात होते. पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगांनी आक्र मण केले की, शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खताचा भरमसाठ वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खताचा डोज न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते.परिणामी शेतकरीही त्यांचा अति वापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा तोकडी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात वांगोडे तयार करून त्यात भाजीपाला लागवड करायचे. त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे. मात्र सध्या कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्ट झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे.कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसानआता शेतकरी रासायनिक खताचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे. या कीटकनाशकांमुळे शेतातील ज्या वनस्पती पिकासाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्त्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे.