अध्यक्षस्थानी श्रीचक्रधर बहु. शिक्षण व विकास संस्थेचे सचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष के. आर. शेंडे होते. उद्घाटन प्रशांत मुनी लखापती बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ. करमचंद आर. शेंडे, कोषाध्यक्ष हनुमती शेंडे, सरपंच पुष्पा जयतवार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मदन शेंडे, प्राचार्य जानकी पटले, माजी सरपंच कुवरलाल बिसेन, टी.जी.कोडापे उपस्थित होते. याप्रसंगी रघुनाथ शेंडे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. शेंडे यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन एल. डी. चंद्रिकापुरे यांनी केले. प्रास्ताविक के. के. लांजेवार यांनी केले. आभार ए. एस. हेडाऊ यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
श्रीचक्रधर स्वामी प्रगट दिन साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST