शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पाणीपट्टीची १७ कोटी ५८ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:35 IST

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही ...

ठळक मुद्देसिंचन विभाग अडचणीत : चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविल्यास शेतकºयांना सिंचन प्रकल्पांच्या मदतीने शेती करावी लागते. मागील दोन तीन वर्षांपासून निसर्गाने सतत दगा दिल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. यंदा देखील कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची भिस्त सिंचन प्रकल्पावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.खरीप आणि उन्हाळी पिकांसाठी शेतकºयांना पुजारीटोला व इटियाडोह या प्रकल्पाच्या उपकालव्यातून पाणी दिले जाते. बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया, आमगाव व सालेकसा या तालुक्यांना तर इडियाडोह प्रकल्पातून जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, लगतच्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यांना पाणी दिले जाते.पुजारीटोला प्रकल्पातून १६५ गावांतील शेतकऱ्याना सिंचनासाठी पाणी दिले जाते. इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यातून १०९ गावातील शेतकरी शेती पिकवितात.शेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाते. यात, पुजारीटोला प्रकल्पासाठी अद्याप पाणी वापर संस्थांची स्थापना झाली नाही. त्यामुळे थेट सिंचन विभागातर्फे शेतकºयांना पाणी दिले जाते.इटियाडोह येथे ५५ पाणी वापर संस्था असल्याने त्यांच्यामार्फत पाणी दिले जाते. यात उन्हाळी शेती तर या प्रकल्पांतून दिल्या जाणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. ज्या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिके घेतात. त्याच पाण्याचे पैसे भरण्याकडे पाणी वापर संस्थाचे दुर्लक्ष झाले आहे.पुजारीटोला व इटियाडोह या दोन्ही प्रकल्पांच्या पाण्यावर शेती करणाऱ्या २७४ गावांतील पाणी वापर संस्था आणि शेतकºयांकडे पाणी पट्टीची १७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यामुळे ५० टक्के सुटशेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने या दरातही सुट दिली जात आहे. त्यानंतर इटियाडोह प्रकल्पाकडून खरिपात २० हजार रूपये दलघमी तर उन्हाळीसाठी ८० हजार रूपये दलघमी असे दर आकारले जात आहे. तर बाघ प्रकल्पाकडून खरिपात २४० रूपये हेक्टरी व उन्हाळीत ७२० रूपये हेक्टरी आकारले जात आहे. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून या दरात शेतकऱ्याना ५० टक्के सुट दिली जाते.प्रकल्पांच्या स्थापनेपासूनची थकबाकी२७४ गावांतील बहुतांश शेतकरी पाणी पट्टीचे थकबाकीदार असतानाच यातील बहुतांश पाणी वापर संस्था आणि शेतकरी या प्रकल्पांच्या स्थापनेपासूनचे थकबाकीदार असल्याचीही माहिती आहे. पुजारीटोला व इटियाडोह हे दोन्ही प्रकल्प सन १९७० च्या सुमारास तयार झाले आहेत. आता ४० वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटूनही कित्येक पाणी वापर संस्था आणि शेतकऱ्यांनी पाणी पट्टी भरलेली नसल्याची माहिती आहे.