शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

जेसीबी, ट्रॅक्टरव्दारे वनतळ्यांचे काम

By admin | Updated: December 25, 2014 23:34 IST

सन २०१२-१३ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रातील मालीजुंगा या गावाच्या परिसरात वनतळ्यांचे काम करण्यात आले. या कामावरील हजेरीपटावर

सौंदड : सन २०१२-१३ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रातील मालीजुंगा या गावाच्या परिसरात वनतळ्यांचे काम करण्यात आले. या कामावरील हजेरीपटावर बाहेरगावच्या बोगस मजुरांची नावे दाखवून लाखो रुपयांची मजुरी परस्पर बँकामधून काढण्यात आली. हा प्रकार सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूक संमतीने झाल्याचे बोलले जाते.सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात सन २०११-१२ व १३ मध्ये वनतळी व स्टोरेज बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मालीजुंगा येथील वनतळीचे काम रोहयो योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले होते. हे काम बिटरक्षक व वनमजुरांच्या देखरेखीत कंत्राटदाराच्या सहाय्याने करण्यात आले. या वनतळ्याचे काम मग्रारोहयोेंतर्गत करायचे होते. परंतु सडक/अर्जुनी वनक्षेत्राधिकारी के.ए.बावनकर यांनी हे काम आपल्या मर्जीतल्या खास विश्वासू वनकर्मचाऱ्यांच्या देखरेखीत पूर्ण केले. या वनतळीच्या कामात रपट्याचे सिमेंट क्रांकीटचे काम होते. तेव्हाच १० ते १२ मजूर कामाला लावले. परंतु हजेरी पटावर अनेकांचे बोगस नावे टाकण्यत आले अहेत. २० किमी अंतरावरील बाहेर गावच्या व्यक्तींची नावे मजूरंमध्ये टाकण्यात आले आहेत. या वनतळ्याचे काम कंत्राटदाराने जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण केले. परंतु या वनतळ्यांचे काम बाहेर गावच्या मजुरांच्या सहाय्याने करण्यात आले, असे दाखवून त्यांचे काम न करताही हजेरीपटावर हजेरी लावण्यात आली. त्यांचे विविध बँकामध्ये खोटे बिल सादर करुन रक्कमही उचल करण्यात आली. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी मालीजुंगा येथील नगरिकांनी केली आहे. रोजगार सेवक व कनिष्ट अभियंत्याला हाताशी धरून खोटे हजेरीपट भरुन या कामाचा निधी हडप करण्यात आला. या कामाची पाहणी करण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्राधिकारी प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केलीच नाही. सर्व काम कंत्राटदार व खास वनकर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सोडण्यात आले. येथे विशेष म्हणजे वनतळी व बंधाऱ्याच्या कामावर तहसीलदारांने देखरेख ठेवणे अपेक्षित असते. प्राप्त निधीच्या रकमेतून ६० टक्के निधी मजुरांच्या मजुरी करीता वापरली जाते. ४० टक्के निधी साहित्याकरिता खर्च करण्याची शासकीय तरतूद आहे. परंतु सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे ४० टक्के रक्कम वापरण्यात आली नाही. हजेरीपटावर बोगस नाव लिहून लाखोचा निधी हडप करण्यात आला. मालीजुंगा येथील वनतळ्यांच्या कामावर कोहळीटोला, चिरचाडी, डोंगरगाव येथील मजूर हजेरीपटावर दाखविण्यात आले आहेत. परंतु मालीजुंगा वरुन या गावाचा अंतर २० ते २५ किमी आहे. एवढ्या लांब अंतरावरून हे मजूर काम करण्यास मालीजुंगा येथे कसे येऊ शकतात. हे न समजणार कोडे आहे. मालीजुंगा येथील एकही मजूर कामावर न जाता त्यांचे सुध्दा नाव हजेरीपटावर आहे. त्यांच्या नावाची रक्कम वनपरिक्षेत्राधिकारी बावणकर यांनी हडप केली. या कामावरील हजेरीपट क्र. १०६३५९ दि. ३ एप्रिल२०१२ ते ९ एप्रिल २०१२ नुसार १९७४६ बँक आॅफ महाराष्ट्र डव्वा शाखा, ६२२६ स्टेट बँक सडक/अर्जुनी, २५९४ देना बँक सडक/अर्जुनी, एकूण ४३ हजार ८०६ रुपये, १०४०० रूपये ग्रामीण बँक सडक/अर्जुनी, ४८४० रुपये को-आॅप बँक सडक/अर्जुनी या कामावरील सर्व मजूर कोहळीटोला, चिरचाडी येथील आहेत. २० किमी हजेरी पट क्रं. १०६३६०-६१ दि. १० एप्रिल २०१२ ते १७ एप्रिल २०१२ नुसार ४५२९ रुपये देना बँक सडक/अर्जुनी मजूर कोहळीटोला, १८ हजार १७१ रुपये महाराष्ट्र बँक डव्वा मजुर कोहळीटोला, ८५४८ रुपये जिल्हामध्यवर्ती सहकारी बँक सडक/अर्जुनी येथून कोहळीटोला येथील मजूरांच्या खात्यत, २६२४० रुपये को आॅप बँक पांढरी मजुरांच्या, पांढरी, रेंगेपार, मालीजुगा, ९४४६ रु. वैनगंगा ग्रामीण बँक सडक/अर्जुनी मजुर कोहळीटोला, १२०२६ रुपये वैनगंगा ग्रा. बँक पांढरी मजूर मालीजुंगा, पांढरी, रेंगेपार, ४८७८ रुपये स्टेट बँक सडक/अर्जुनी मजूर कोहळीटोला हजेरी पट क्रं. ११०१६०-६१ कालावधी १८ एप्रिल २०१२ ते २३ एप्रिल २०१२ ला १६ हजार ४१६ रुपये वैनगंगा ग्रा.बँक पांढरी, ४१६०२ रु. को. आॅप बँक पांढरी, १५५७८ रुपये महाराष्ट्र बँक डव्वा, २५९० रुपये देना बँक सडक/अर्जुनी, ४३१० रुपये स्टेट बँक सडक/अर्जुनी, ७८०० रुपये ग्रामीण बँक सडक/अर्जुनी, २५९० रुपये को. आॅप बँक सडक/अर्जुनी, एकूण ९०८८६१ रुपये हजेरी पट क्रं. ११०१६४, ११०१६५, ११०१६२ कालावधी १ ते ३ मे २०१२ व ४ जून ते ११जून २०१२ एकूण २३७४४ रु. हजेरीपट क्र. ११०१६२ कालावधी २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०१२ दरम्यान १ लाख ११ हजार ६३ मजुरांच्या खात्यात वळविण्यात आले. असे सर्व बँकेतील ३ लाख ४२ हजार ३८० रुपयांची उचल करण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही. (वार्ताहर)