शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घर गहाण ठेवण्याची वेळ आली, हे कसले लॉकडाऊन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST

मागील दोन तीन महिन्यांपासून सर्वच उद्योगांची गाडी रुळावर येत असताना, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे छोट्या उद्योजकांची सर्वात कोंडी झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह, इतर खर्च, व्यापारी आणि बँकांची देणी कुठून फेडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमधून सावरण्यासाठी दागिने विकले; आता घर गहाण ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. लॉकडाऊनच्या नावावर छोट्या उद्योजकांना एकप्रकारे वेठीस धरले जात आहे.

ठळक मुद्देलघु व्यावसायिकांवर संकट : अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागीलवर्षी मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळपास चार महिने उद्योग-धंदे बंद होते. यामुळे अनेकांचे बजेट बिघडले, अनेकांचे कर्जाचे हप्ो थकले, तर काहींना उधार उसनवारी करून वेळ मारून नेण्याची वेळ आली. अनेकांनी काटकसर करून कसेबसे सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील दोन तीन महिन्यांपासून सर्वच उद्योगांची गाडी रुळावर येत असताना, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे छोट्या उद्योजकांची सर्वात कोंडी झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह, इतर खर्च, व्यापारी आणि बँकांची देणी कुठून फेडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमधून सावरण्यासाठी दागिने विकले; आता घर गहाण ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. लॉकडाऊनच्या नावावर छोट्या उद्योजकांना एकप्रकारे वेठीस धरले जात आहे. त्यामुळे गोरगरिबांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना लघु व्यावसायिकांचा विचार करण्याची गरज आहे.  

मागीलवर्षी सात महिनेच सुरू राहिले दुकानजिल्ह्यात मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत दुकाने बंदच होती. त्यामुळे दुकानाचे भाडे, विजेचे बिल, कामगारांचा पगार हे सर्व घरूनच द्यावे लागले. त्यातच व्यापाऱ्यांचे देणे असल्याने त्यासाठी उधार-उसनवारी करावी लागली, तर यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योगधंदे पुन्हा चौपट झाले आहेत. 

सततच्या लॉकडाऊमुळे तणाव वाढतोय 

आमची चहाची छोटीशी टपरी आहे. त्यावरच आमच्या कुटुंबाचा गाडा चालतो; मात्र आता शासनाने पुन्हा लॉकडाऊन केल्याने मागील पाच-सहा दिवसांपासून दुकान बंद आहे. पुन्हा किती दिवस बंद राहतील, याचा नेम काहीही नेम नाही. अशातच आमच्यासारख्या लोकांनी जगावं तरी कसं, हे आम्हाला शासनानेच सांगावे.- छाया मडावी, गृहिणी  

आमचे छोटेश हॉॅटेल असून, आमच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. याच व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मागीलवर्षी लॉकडाऊनमुळे कर्ज काढून जगण्याची वेळ आली होती. त्याचेच हप्ते अजून फेडून झाले नाहीत. त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने घर गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. - मीनाक्षी उमक, गृहिणी 

शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना किमान आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांचा विचार केला पाहिजे. लाॅकडाऊन करायचे आहे, मग आम्हाला अनुदान तरी द्यावे. प्रत्येकवेळी कुणाकडे हात पसरायचे. आता कुठे उद्योगधंद्यांची गाडी रुळावर आली होती. त्यातच आता पुन्हा दुकाने बंद झाल्याने आम्ही जगायचे कसे. - मीराबाई जाधव, गृहिणी.