शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

गोंदियात प्रदूषण मोजणारे यंत्रच नाहीत

By admin | Updated: June 5, 2017 00:55 IST

जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास : राईस मिल्सची तपासणी अधिकाऱ्यांच्या मनमर्जीनेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र दूषित गोंदियाचे प्रदूषण किती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गुणवत्ता मोजणारे यंत्रच नाही. प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत सरकार विविध उपाययोजना करीत असताना गोंदियातील प्रदूषणाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे ‘अर्थपूर्ण’ संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे याकडे आतापर्यंत जिल्हा प्रशासनानेही कधी गांभिर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.‘रेड’ मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भातील सूचना संबधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योग कंपन्यांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल्स असून त्यांची गेल्या दोन वर्षापासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीच झालेली नाही. राईस मिल्समधून फक्त धानाची मळणी करून तांदूळ बनविणाऱ्या २०० तर उष्णा तांदूळ तयार करणाऱ्या ६० राईस मिल्स आहेत. तांदूळ तयार करणाऱ्या राईस मिल्सना प्रदूषण मंडळ प्लेन लि तर उष्णा तांदूळ काढणाऱ्या मिल्सना पॅरामीट राईस मिल म्हणून संबोधतात. या राईस मिलमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाऱ्या प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र गोंदिया शहरात नाही. गोंदिया जिल्हा निर्मीती होऊन १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र गोंदियात अजूनही प्रदुषण मापक यंत्रणा नाही. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. त्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची गर्दीही वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. राईस मिल्समधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याची तपासणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतच नाही. यावरून गोंदियातील राईस मिल मालक व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याची खात्री पटते.वृक्षांची कत्तल व लागणाऱ्या आगी कारणीभूतवाढत्या प्रदूषणाबरोबर सतत होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे जंगलाचे रूपांतर माळरानात होत आहेत. त्यामुळे संतुलन ढासळत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात वन जमिनीला आग लागली. जिल्ह्याच्या ४३ टक्के जमीनीवर वन आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात २५ हजारापेक्षा झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारणे पर्यावरणाला घातक ठरत आहेत.एकच व्यक्ती सांभाळते दोन जिल्हेप्रदूषण नियंत्रण मंडळात चार पदे मंजूर असून फक्त उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी हे एकच अधिकारी कार्यरत आहेत. तीन फिल्ड आॅफीसरची पदे मंजूर असताना तिन्ही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. रिक्त पदांमुळे मागील अनेक वर्षापासून गोंदियातील प्रदूषण किती आहे हे अधिकाऱ्यांना सांगताच येत नाही.रेतीमाफियांमुळे ढासळतेय पर्यावरणनद्यांमुळे जलस्तर वाढतो. नदीतील पाण्याला जमिनीत मुरविण्यासाठी त्या नदीतील रेती महत्वाची ठरते. परंतु अलीकडे रेतीचा उपसा करणारे कंत्राटदार पर्यावरण नियमांना बगल देत जेसीबीच्या सहाय्याने नदीतील रेती काढतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. बाराही महिने प्रवाहित असणारी वैनगंगा नदी यावर्षी कोरडी झाली. त्यामुळे रेती उपसा करणाऱ्या कंत्राटदारांनी या नदीची काय दुरवस्था केली आहे, याची कल्पना येते.