लोकमत विशेषकपिल केकत ल्ल गोंदियाजिल्हावासीयांसाठीच नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील लगतच्या रहिवाशांकरिता महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या गोंदियात दररोज कोट्यवधीची उलाढात होते. बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो लोकांची येथे वर्दळ असते. मात्र चकाचक आणि एकापेक्षा एक पॉश दुकानांनी ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या गोंदियात दुकानांबाहेरील स्थिती मात्र अतिशय दयनिय आहे. शौचालय तर दूर, साधे लघुशंका करण्याचीही सोय येथे नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्त्यालगतच लघुशंका करताना दिसतात. यामुळे अनेक रस्त्यांवर घाणीतून आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातून वाट काढावी लागते.विविध प्रकारच्या खरेदीसोबतच जिल्हास्थळ असल्याने विविध सरकारी कार्यालयांमध्ये कामांसाठी, वैद्यकीय उपचारासाठीही येथे हजारोंच्या घरात लोकांचे आगमन होत असते. महत्वाचे रेल्वे स्थानक असल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना येथूनच पुढील प्रवासासाठी गाडी पकडावी लागते. असे असताना शहरातील सुमारे दीड लाख लोकांसह बाहेरून येणाऱ्या हजारो लोकांच्या सुविधेसाठी शहरात सुलभ शौचालयांचा अभाव आहे. संपूर्ण शहरात फक्त तीन सार्वजनिक शौचालये व चार मूत्रीघर आहेत. यातील एकही शौचालय किंवा मूत्रीघर वर्दळीच्या मार्केट परिसरात नाही, हे विशेष. अशा परिस्थितीत नागरिकांची, मुख्यत: महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून येते. सुविधा नसल्याने पुरूष मिळेल त्या जागेवर लघुशंका उरकून घेतात. मात्र महिलांची मोठी कुचंबना होते. बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शहरात कुणी परिचयाचे राहतातच असे नाही. अशात त्यांच्यासाठी शौचालयाची नितांत गरज असते. मात्र गोंदिया शहरात त्यांच्यासाठी सुविधा नाही. या शहरात प्रत्येक वस्तू विकत मिळते. सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून तर इलेक्टॉनिक्स सामान, कपडे आणि सर्व प्रकारच्या बारीकसारीक वस्तू उपलब्ध आहेत. मात्र शौचालयांच्या बाबतीत शहर माघारलेले आहे. हेच कारण आहे की, शहरात बघावे तेथे उघड्यावरचा कारभार नजरेत पडतो. यामुळे परिसर दुषीत होत असून तेथून ये-जा करणे म्हणजे डोक्याला ताप झाला आहे. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे. शहरात केवळ तीन शौचालय शहरात नगर परिषद कार्यालयासमोर, राजस्थान कन्या विद्यालयाच्या मागे व कचरा मोहल्ल्यातील दर्ग्याच्या बाजूला असे पालिकेचे तीन शौचालय आहेत. त्यांचीही देशभाल दुरूस्तीअभावी दुर्गती झाली आहे. त्यामुळे त्यांचाही वापर करणे नागरिकांसाठी धोक्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्यापासून दूरच राहात आहेत. फायबरचे चारही मुत्रालय बिनकामाचेनगर परिषदेने तीन वर्षांपूर्वी शहरात फायबरचे मुत्रालय लावण्याचा प्रयोग करण्याचे ठरविले होते. त्यासाठी चार फायबर मुत्रालय खरेदी करण्यात आले. सुमारे ९० हजार रूपये प्र्रत्येकी दराने हे मुत्रालय खरेदी करण्यात आले. शहरातील चार ठिकाणांवर हे मुत्रालय नागरिकांच्या सोयीसाठी बसविण्यात येणार होते. मात्र त्या परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे त्यांना इतरत्र हलविण्यात आले. त्यातील एक तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात, दुसरे सिंधी शाळेजवळ, तिसरे सुभाष बागेत तर चौथे रामनगर बाजार चौकात ठेवण्यात आले आहे. पण त्यात कधीही पाणीच टाकल्या जात नसल्यामुळे त्यांचाही वापर कोणी करीत नाही.ही आहेत उघड्यावरची मूत्रीघरेरेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर शहरात जाण्यासाठी वापरला जाणारा प्रभू रोड हा मार्ग उघड्यावरील मूत्रीघर झाला आहे. येथे महिलावर्ग रस्त्याने जात असतानाही त्याचे कोणाला सोयरसुतक नसते. पुरूष लाज-शरम सोडून रस्त्याच्या कडेला आपले काम उरकून घेतात.बाजार भागात व तहसील कार्यालय परिसरात बघावे तेथे कोपरा बघून आपले काम उरकून घेणारे हमखास दिसून येतात. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील भाग हक्काचे मूत्रीघर झाले आहे.शहराच्या सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या बंगल्यासमोरील आणि सुभाष गार्डनलगतच्या भागातही बिनधास्तपणे लघुशंका उरकली जाते. शहराच्या मध्यवस्तीमधील भाजी मार्केटमधील एका बोळीतील जागेलाही हक्काचे मूत्रीघर बनविण्यात आले. त्यामुळे तेथून नाक दाबल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नसते.
गोंदिया बनले उघड्यावरचे मूत्रीघर
By admin | Updated: February 13, 2015 01:17 IST