शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

गरजेएवढे बियाणे शेतकऱ्यांना नि:शुल्क द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:33 IST

शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे.

ठळक मुद्देबळीराजा शेतकरी संघ : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे, तेवढे बियाणे नि:शुल्क शासनाकडून त्वरित देण्यात यावे. अन्यथा बळीराजा शेतकरी संघ शेतकऱ्यांच्या हितात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.बळीराजा शेतकरी संघाच्या इतर मागण्यांमध्ये खरीप हंगामात कर्ज व बियाणे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयातून सातबारा त्वरीत देण्यात यावा. एका सातबाऱ्यावर एक बॅग बियाणे ही अट शिथिल करावी. बियाणे नि:शुल्क किंवा ५० टक्के अनुदानावर द्यावे. सातबाऱ्यावर जेवढे खत हवे आहे तेवढे खत शेतकऱ्यांना देण्यात यावे. डिझेल पंपासाठी शेतकऱ्यांना कमी दरात डिझेल द्यावे. दुष्काळात शासनाने घोषित केलेले पेर-नापेरचे अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, ते त्वरित जमा करावे. शेतकºयांना मागील विमा योजनेचे रूपये तात्काळ देण्यात यावे. यावर्षीचा खरीप हंगाम विमा करणाºया विमा कंपन्यांना त्वरित सूचना देण्यात यावी. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाच्या बोनसची रक्कम त्वरीत देण्यात यावी. पेरणीच्या वेळी कृषी सहायकांनी गावात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. बियाणे व खताच्या कमतरतेवेळी शेतकऱ्यांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.क्रॉप लोन तात्काळ द्यावे. नैसर्गिक आपत्ती निधीतून शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाच्या सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे, मोहनलाल कटरे, मदनलाल तुरकर, तुलाराम दिहारी, योवकराम रहांगडाले, रूपचंद शरणागत, टीकाराम टेंभरे, उत्तम भगत, भरतलाल रिनाईत, एस.वाय. तुरकर, पुरण पटले, सुनील टेंभरे, पप्पू ठाकरे, उर्मिला रहमतकर, श्रीधर चन्ने, देवचंद बिसेन, रोशन बोपचे, दुलीचंद गायधने, शेजगावचे सरपंच मुन्ना चौरागडे, मुनेश कावडे, सुरेंद्र दमाहे, राजेंद्र मेश्राम, राजेंद्र पटले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी