शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

सराफा व्यावसायिकांची गांधीगिरी

By admin | Updated: March 6, 2016 01:35 IST

एक्साईज ड्युटी लावल्याने सराफा व्यापारात नफा राहणार नसल्याने येथील सराफा व्यावसायिकांनी शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी....

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्व : सरकारी टॅक्सविरोधात असोसिएशनचे आंदोलन गोंदिया : एक्साईज ड्युटी लावल्याने सराफा व्यापारात नफा राहणार नसल्याने येथील सराफा व्यावसायिकांनी शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर शनिवारी (दि.५) दुर्गा चौकात चहानाश्त्याचे दुकान थाटले. सराफा व्यवसायिकांचे हे आगळेवेगळे गांधीगिरीचे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले. सोमवारपर्यंत (दि.७) वाढविण्यात आलेल्या सराफा व्यवसायिकांच्या या बंदबाबत आता सोमवारीच पुढील निर्णय होणार आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे गोंदियासह जिल्हाभरात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडले आहेत.अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. भारतात दागिन्यांचे ९० टक्के काम कारागिरांकडून केले जाते. त्यात आता दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक्साईज ड्युटी लावण्यात आल्याने त्यांच्या नियमावलीचे पालन करणे सुवर्ण व्यावसायिकांसाठी अशक्य असून देशभरात सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यवसायिकांनी बंद पुकारला आहे. २, ३ व ४ मार्चपर्यंत हा बंद होता. या दरम्यान गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने गुरूवारी (दि.३) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अर्थमंत्री अरूण जेटली यांना निवेदन पाठविण्यात आले. आपल्या मागणीला घेऊन सराफा असोसिएशनचे मंत्र्यांसोबत बोलणे सुरू असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आकरिता बंद सोमवारपर्यंत (दि.७) वाढविण्यात आला आहे. एक्साईज ड्युटी लावल्याने आता सराफा व्यापारात काहीच नफा राहणार नसल्याने शासनाच्या या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी व सराफा व्यवसायिकांची मनस्थिती दशर्विण्यासाठी सराफा असोसिएशनने शनिवारी (दि.५) दुर्गा चौकात चहानाश्त्याचे दुकान थाटले. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर लावण्यात आलेल्या या दुकानात फक्त ५ रूपयांत लोकांना चहानाश्ता देण्यात आला. सराफा व्यवसायिकांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची शहरात चर्चा होती. चहानाश्त्याच्या दुकानात चहा-नाश्ता देत असलेल्या शहरातील मोठ्या सराफा व्यवसायिकांना बघून शहरवासीयांना आश्चर्य वाटत होते. (शहर प्रतिनिधी)