शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पुनर्वसनातून उजळले वनप्रकल्पबाधितांचे भाग्य

By admin | Updated: July 21, 2016 01:07 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या आत वास्तव्य करताना सतत वन्यप्राण्यांच्या भितीत वावरणाऱ्या लहान-लहान पाच गावांतील ३७४ कुटुंबांना ...

देवानंद शहारे गोंदिया नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या आत वास्तव्य करताना सतत वन्यप्राण्यांच्या भितीत वावरणाऱ्या लहान-लहान पाच गावांतील ३७४ कुटुंबांना आता या भीतीतून मुक्ती मिळाली आहे. मागील पाच वर्षांत या गावांचे चित्रच नव्हे तर ग्रामस्थांचे भाग्यसुद्धा बदलले आहे. आता ते भयमुक्त असून नवीन वातावरणात जीवन जगायला शिकले आहेत. ही गोष्ट अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तुमडीमेंढा व मलकाझरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाटी व झनकारगोंदी गावांची आहे. ही पाच गावे अत्यंत घनदाट जंगलात वसलेली होती. उंच डोंगर-पहाड व दगडयुक्त जमिनीवर वसलेल्या या गावांत कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नव्हत्या. या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नव्हते. शाळासुद्धा नव्हत्या व इतर कोणत्याही सुविधा नव्हत्या. या गावांत कोणतेही वाहन सहजतेने जावू शकत नव्हते. परंतु आता या पाचही गावांतील नागरिकांना पक्की घरे मिळाले आहेत. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून त्यात रक्कम जमा झाली आहे. त्यांच्यासाठी पक्के रस्ते, सिमेंटच्या नाल्या, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, गॅस कनेक्शन, समाज मंदिर, शाळा आदी सर्व बाबी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित केले. वाघ आणि इतर जंगली जनावरांना मुक्त विहार करण्यासाठी एका कॉरिडोरची निर्मिती केली. जंगलाच्या आत वसलेल्या गावांतील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची शासनाने योजना बनविली. त्या योजनेचा लाभ सदर नागरिकांना मिळाला. तुमडीमेंढा येथील पाच, मलकापुरी येथील ३७, कवलेवाडा येथील १७०, कालीमाटी येथील १३५ व झनकारगोंदी येथील २७ कुटुंबांना सदर लाभ मिळाला आहे.शासनाने सदर गावांच्या लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा लाभ देण्यासाठी आतापर्यंत ४२ कोटी ३ लाख ९१ हजार रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध केली आहे. यापैकी मागील एक महिन्यापूर्वीपर्यंत ३९ कोटी ५० लाख ८२ हजार ४०३ रूपये खर्च झाले आहेत. या रकमेमधून ५८ लाख तीन हजार ७५३ रूपये सुरूवातीचा पाणी पुरवठा व स्टँप खरेदीसाठी खर्च करण्यात आले. ४० कोटी ०८ लाख ८६ हजार १५६ रूपये सदर लाभार्थ्यांच्या संयुक्त (पती-पत्नी) बँक खात्यात जमा करण्यात आले. शासनाने त्या लाभार्थ्यांसमोर दोन अटी ठेवल्या होत्या. पहिल्या अटीनुसार १० लाख रूपये घेवून जंगलातून बाहेर निघणे व दुसरी अट पुनर्वसनाची होती. सदर पाचही गावांतील नागरिकांनी १० लाख रूपये घेणे स्वीकार केले. यानंतरही शासनाच्या वतीने त्यांचे पुनर्वसन सौंदड जवळील श्रीरामनगर येथे करण्यात आले. स्वत:ची मिळणार पंचायत श्रीरामनगर येथे वसलेल्या पुनर्वसित नागरिकांसाठी वेगळ्या ग्रामसभेचा प्रस्ताव पारित करून शासनास पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावातर्गत नवीन ग्रामपंचायत बनविण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने श्रीराम नगरात वार्ड घोषित करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात श्रीरामनगर येथे ग्रामपंचायतची निवडणूक होवू शकते. एक प्रस्ताव श्रीरामनगर येथे नवीन ग्रामपंचायत भवन बांधकामाचासुद्धा आहे. दोन कुटुंब अजूनही वनात कवलेवाडा येथील दोन कुटुंब आतापर्यंत पुनर्वसित गाव श्रीरामनगर येथे राहण्यासाठी गेले नाही. हे दोन्ही कुटुंब आतासुद्धा कवलेवाडा गावातच राहत आहेत. त्यांना आताही जंगली जनावरांची भीती सतावते. परंतु त्यांचे म्हणणे आहे की, ते नवीन ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. पुनर्वसन योजनेचा लाभ त्यांच्या मुलांना मिळायला हवा. ५ जनू २००८ च्या शासन आदेशानुसार, ज्यांच्या मुलांचे वयाची १८ वर्षे पूर्ण झाले नाही, त्यांना सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळेच आत्माराम माधव वाढवे व नंदलाल हिरामन बागडे यांच्या बालकांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन जंगलातच राहणे पसंत केले आहे. त्या दोन्ही कुटुंबांच्या बालकांना लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. परंतू तो मंजूर होईल अथवा नाही, हे सांगणे कठीण आहे. ...आणि बदलले चित्र जंगलात वसलेल्या पाचही गावांची एकूण १८७.७० हेक्टर जमीन शासनाने हस्तांतरित केलेली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक कुटुंबाला १ हजार ३०० ते दीड हजार चौरस फूट जमीन श्रीराम नगरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. १० लाख रूपये प्रतिकुटुंब बँक खात्यात जमा केल्यानंतर आणखी ते लाभार्थी कोणत्याही लाभाचे हकदार नव्हते. यानंतरही शासनाच्या वतीने सिमेंट नाली बांधकामासाठी १५ लाख रूपये, पाणी पुरवठ्याच्या एका योजनेसाठी ४५.९४ लाख रूपये, दुसऱ्या योजनेसाठी ८.८१ लाख रूपये दिले. एवढेच नाही तर विद्युत पुरवठ्यासाठी २८ लाख ९४ हजार १३४ रूपये, रस्ते बांधकामासाठी १५ लाख २६ हजार ५४५ रूपये, सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी ८ लाख ५१ हजार २४२ रूपये, शाळा बांधकामासाठी १७.१४ लाख रूपये, दोन अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी १० लाख रूपये, समाजमंदिर बांधकामासाठी ९ लाख ७२ हजार ४०९ रूपये आणि पथदिव्यांसाठी ६५ हजार रूपये खर्च केले. येथे बस थांबाही बनविण्यात आला आहे. १६० लोकांच्या नावे ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन, ६० लोकांना दुधाळू जनावरे व १०० टक्के लोकांना कुक्कुटपालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधा अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.