शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

शेतकरी दिसायला मोठा, पण आतून पोकळ

By admin | Updated: November 28, 2015 02:56 IST

यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.

बन्सोड यांचे मत : मजुरांना पेंशन मिळवून देण्याचा प्रयत्न काचेवानी : यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला पाहता तो दिसतो मोठा, पण आतून पोकळ आहे, असे मत माजी आ. दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.बरबसपुरा येथे मंडईनिमित्त तमाशाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते सरपंच ममता लिचडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, उपसरपंच धनलाल रहांगडाले, माजी सरपंच सदाशिव कटरे, पोलीस दिलीप मेश्राम, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भिष्मकुमार परिहार, ग्रा.पं. सदस्य ममता पटले, तिडके, तेजराम चौधरी उपस्थित होते.या वेळी सरपंच ममता लिचडे आणि उपसरपंच धनलाल रहांगडाले यांनी गावच्या समस्या निदर्शनात आणून दिल्या. उद्घाटनीय भाषणात माजी आ. बंसोड यांनी, पदावर असताना बरबसपुरा गावच्या समस्या आणि विकास कामाकरिता भरपूर प्रयत्न केले. आज आपण पदावर नसलो तरी समस्या घेऊन या, आपण निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करू. शेतकरी शब्द समोर येताच खूप वाईट वाटते. आज शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी ५० टक्के उत्पन्न मिळणार नसून त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले. मग्रारोहयोतंर्गत १०० दिवसांचे काम प्रत्येक मजुरास मिळावे याकरिता ग्रा.पं.ने कामाची योजना तयार करावी. मजुरांची यादी तयार करुन ती मंजूर करावी. याकरिता आपण केव्हाही मदत करण्यास तयार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी शंभर दिवस कामे केले त्यांची नावे कल्याण कामगार आयुक्तालयात नोंदणी करून त्यांना पेंशन मिळवून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारू व त्यासाठी प्रयत्नास सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन प्रा. नरेश असाटी यांनी केले. आभार किशोर असाटी यांनी मानले. (वार्ताहर)ओबीसीसाठी निधी उपलब्ध होत नाहीघरकुलाचा निधी असो किंवा शिष्यवृत्तीचा निधी असो, ८० टक्के निधी केंद्रशासन आणि २० टक्के निधी राज्यशासन देते. परंतु घरकुलाकरिता निधी उपलब्ध होत नसल्याने लाखो घरकूल आजही तयार होवू शकले नाहीत. ओबीसीकरिता विकासाच्या नावावर होत असलेला अन्याय विरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आपण निदर्शनात आणून देवू, असे माजी आ. बंसोड यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शाळा समित्यांनी लक्ष केंद्रित करावेसध्या शिक्षण पध्दतीत बदल होत असल्याने भविष्यात शिक्षक संख्येची समस्या निर्माण होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या शाळेत १०० पटसंख्या असेल तर मात्र तीन शिक्षक कार्यरत राहतील. तीन शिक्षक सात वर्गांना शिक्षण देवू शकणार नाही. अशावेळी खेडे गावातील विद्यार्थी गावातच राहणार नाही. याकरिता शाळा समिती आणि पालकांनी शाळेकडे लक्ष देऊन अशा समस्या निदर्शनात आणून द्यावे. यावर शासन स्तरावर आपल्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल, असा सल्ला माजी आ. बंसोड यांनी दिला.