शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

धाडसच ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार

By admin | Updated: November 2, 2015 01:25 IST

चेहऱ्यावर मासूमी, पण थोडे दु:खही. एचआयव्ही पॉझिटिव्ह असणे म्हणजे सामान्यत: जीवनाचा शेवटच समझला जातो.

तीन हजार एचआयव्ही पॉझिटिव्ह : सहा महिन्यांत ११२ नवीन रूग्ण, चार नवजात एचआयव्हीबाधितदेवानंद शहारे गोंदियाचेहऱ्यावर मासूमी, पण थोडे दु:खही. एचआयव्ही पॉझिटिव्ह असणे म्हणजे सामान्यत: जीवनाचा शेवटच समझला जातो. मात्र हे अपूर्ण सत्य आहे. धाडस ठेवून तेसुद्धा आपले जीवन जगू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालले तर असे लोकही लांब काळापर्यंत सामान्य जीवन जगू शकतात. गोंदिया जिल्ह्यात जवळपास तीन हजार लोक पॉझिटिव्ह आहेत. नोंदणीकृत २ हजार ८३ लोकांपैकी १ हजार ५०१ रूग्ण एआरटी (एन्टी रिट्रोव्हायरल थेरपी) घेत असून सामान्य जीवन जगू लागले आहेत. सन २०१५-१६ मध्ये ११ हजार ७१० लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट होते. १४ हजार ३७० लोकांची तपासणी करण्यात आली. यात ११२ जण पॉझिटिव्ह आढळले. यात ६६ पुरूष, ४५ महिला व एका नपुंसकाचासुद्धा समावेश आहे. यापैकी ११० रूग्ण एआरटी घेत आहेत. त्यातच गरोदर महिलांच्या तपासणीचे (एएनसी) उद्दिष्ट नऊ हजार ठेवण्यात आले होते. त्यात १२ हजार ५८७ महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यात सहा महिला अशा होत्या, ज्या आधीपासूनच पॉझिटिव्ह होत्या. तर चार महिला नवीन पॉझिटिव्ह आढळल्या. पॉझिटिव्ह महिलांपासून जन्मलेल्या १७ बालकांची १८ महिन्यांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत चार बालके पॉझिटिव्ह आढळले, तर १३ बालके सामान्य आढळले.एचआयव्ही पीडितांची आठवड्यातून दोन दिवस, सोमवार व गुरूवारी सीडी-४ चाचणी केली जाते. नमुणे तपासणीसाठी नागपूरला पाठविले जातात. एआरटी घेणाऱ्यांमध्ये दुर्ग, राजनांदगाव, बालाघाट व इतर जिल्ह्यातील रूग्ण अधिक आहेत. गोंदियात ३० मार्च २०१० पासून एआरटी सेंटर सुरू आहे. गोंदिया सीमावर्ती जिल्हा असूनही येथील स्थिती सुखद आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गोंदियात खूप कमी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.गोंदियाच्या केंद्रात बाहेरचे रूग्णगोंदियाच्या जवळचे जिल्हे व जवळच्या राज्यातील रूग्णांची संख्या अधिक आहे. मध्य प्रदेशचे २५० व छत्तीसगडच्या १० रूग्णांची नोंदणी गोंदियाच्या केंद्रात करण्यात आली आहे. तसेच भंडारा व इतर जिल्ह्यातील काही रूग्णांचीही नोंद येथे आहे. हे सर्व रूग्ण एआरटीसाठी येतात. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात १०-१२ दिवसांपूर्वीच एआरटी सेंटर सुरू झाले आहे. हळूहळू तेथे रूग्णांना हलविण्यात येईल. एचआयव्हीबाधित १६ रूग्णांचा मृत्यूजिल्ह्यात मागील वर्षी एचआयव्ही-एड्समुळे १२ रूग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी आतापर्यंत चार रूग्णांचा मृत्यू झाला. यातील काही मृत्यू अशा आहेत, ज्या दुर्घटनेमुळे घडल्या. एचआयव्हीबाधित रूग्णांना ६० टक्के क्षयरोग (टीबी) होण्याचा धोका असतो. तर क्षयरूग्णांना १० टक्के एचआयव्ही असण्याची शक्यता असते. जर क्षयरोग असेल तर एचआयव्ही रूग्णांना मृत्यूचा अधिक धोका असतो. आरोग्य विभागाद्वारे सन २०१७ पर्यंत ‘गेटिंग टू झिरो’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे एचआयव्ही रूग्णांची संख्या शून्यापर्यंत आणावयाची आहे. नवीन जन्म घेणाऱ्या शिशूंना एचआयव्हीपासून वाचविणे, हा यामागील उद्देश्य आहे. आता याचे परिणाम हळहळू दिसू लागले आहेत.