लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. शिवाय जबाबदार अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.तुमसर-तिरोडा तसेच गोंदिया शहराच्या काही भागात केबल तुटल्याचे कारण यापूर्वी बीएसएनएल कार्यालयाने दिले होते. हे काम तातडीने सुरु केले जाईल, असेही सांगितले होते. या गोष्टीला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तरीही बीएसएनएलची सेवा पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. गत आठवड्याभरापासून ही सेवा अधिकच त्रासदायक ठरु लागली आहे. कधी सुरु तर कधी मध्येच बंद, असा लपंडाव आहे. दोन-दोन तास इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली आहेत. शासकीय, निमशासकीय असो वा खासगी कार्यालयातील बहुतांश कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन केली जात आहेत. मात्र ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने कामानिमित्त येणाºया नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.परिणामी, अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. मोबाईल सेवेच्या बाबतीतही हेच रडगाणे आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सीम फेकून खासगी कंपन्यांच्या सीम खरेदी करण्याला पसंती दिली आहे.उल्लेखनिय म्हणजे, गोंदिया येथील बीएसएनएलचे कार्यालय वाऱ्यावर आहे. कोणताही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर असताना दिसत नाही. एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या कार्यालयाचा डोलारा उभा आहे.या कर्मचाऱ्यांना इंटरनेट सेवेच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यालयाच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.भंडाऱ्यातून हाकला जातोगोंदिया कार्यालयाचा कारभारभंडारा जिल्ह्याची फाळणी होऊन गोंदिया जिल्हा निर्मितीला दीर्घ कालावधी लोटला. अनेक शासकीय कार्यालये गोंदियात स्थापन झालीत. मात्र, महत्त्वाच्या कार्यालयापैकी एक असलेल्या बीएसएनएल कार्यालयाचा कारभार आजही भंडाऱ्यातून हाकला जातो. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे या कार्यालयाकडे सपेशल दुर्लक्ष झाले आहे.अतिवृष्टीचाही फटकागेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण सेवा विस्कळीत झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे ही सेवा दुरुस्त करता आली नाही. याचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची ग्राहकांची मागणी आहे.
बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:09 IST
गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे.
बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प
ठळक मुद्देआठवडाभरापासून लागले ग्रहण : गोंदियातील कार्यालय वाऱ्यावर