शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

‘बीआरजीएफ’ची १२ कोटींची कामे वाऱ्यावर

By admin | Updated: December 22, 2014 22:48 IST

मागास क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून बीआरजीएफ (मागास क्षेत्र अनुदान निधी) योजनेअंतर्गत विशेष निधी दिला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात गोंदिया

४७७ कामे पडली ठप्प : केवळ प्रशासकीय मंजुरी, निधीच्या नावाने बोंबाबोंबमनोज ताजने/सुजित येवले - गोंदियामागास क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून बीआरजीएफ (मागास क्षेत्र अनुदान निधी) योजनेअंतर्गत विशेष निधी दिला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्याला या योजनेची एक कवडीही मिळालेली नाही. या वर्षाकरिता तब्बल १२ कोटी २१ लाख ३८ हजार रुपयांची कामे मंजूर करून ठेवली असली तरी अद्याप एकाही कामाला सुरूवात झालेली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.गोंदिया हा राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा आणि नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याची निवड ‘बीआरजीएफ’ योजनेसाठी झाली आहे. या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे ना.प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपये या जिल्ह्यासाठी खेचून आणले होते. मात्र यावर्षी परिस्थिती अगदी विपरित आहे. या योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्याच्या आठही तालुक्यांसाठी तब्बल १२ कोटी २१ लाख ३८ हजार रुपयांची ४७७ कामे प्रस्तावित केली होती. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात निधीचा पत्ताच नाही. यावर्षीचा निधी तर नाहीच, पण सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील कामांसाठी मंजूर असलेल्या निधीपैकीही दुसऱ्या टप्प्याचा २ कोटींचा निधीही अजून मिळालेला नाही. या योजनेत शाळा खोली, कोंडवाडा, स्मशानघाट, कृषी गोदाम, नाल्या, रस्ते, आवारभिंत, अंगणवाडी आवार भिंत, समाज भवन, समाजमंदिर, सभामंडप, सार्वजनिक मुत्रीघर, विंधन विहीरी, दुकान गाळे, बाजार ओटे आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता अवघे ३ महिने उरले असताना अद्याप एक दमडीही कशी मिळाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून मागास क्षेत्राच्या विकासकामांबाबत शासन किती गंभीर आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.