शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

By admin | Updated: April 6, 2017 00:53 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूूर मंडळांतर्गत कळमना-गोंदिया-दुर्ग मार्गावर कळमना-कामठीदरम्यान व दुर्ग-गोंदिया-कभमना

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूूर मंडळांतर्गत कळमना-गोंदिया-दुर्ग मार्गावर कळमना-कामठीदरम्यान व दुर्ग-गोंदिया-कभमना मार्गावर दुर्ग-रसमडादरम्यान डाऊन व अप लाईन्सच्या देखभाल कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे. कळमना-गोंदिया-दुर्ग मार्गावर कळमना-कामठी मध्यडाऊन लाईनवर ७ व २१ एप्रिल तसेच ५ व १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ११.४५ वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर दिवसी इतवारी स्थानकावरून गाडी (५८११२) इतवारी-टाटानगर पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने रवाना करण्यात येईल. याशिवाय गाडी (६८७४१) दुर्ग-गोंदिया पॅसेंजर, गाडी (६८७४३) गोंदिया-इतवारी पॅसेंजर, गाडी (६८७४४) इतवारी-गोंदिया, गाडी (६८७४२) गोंदिया-दुर्ग, गाडी (६८७१४) इतवारी-गोंदिया व गाडी (६८७१५) गोंदिया-इतवारी रद्द राहणार आहेत. तसेच दुर्ग-गोंदिया-कलमना मार्गावर दुर्ग-रसमडाच्या मधील अप लाईनवर १४ व २८ एप्रिल तसेच १२ व २६ मे २०१७ रोजी रात्री ८.४० ते रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचे ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सदर दिवसी गाडी (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू रद्द राहील. गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर एक्सप्रेसला दुर्गमध्ये एक तास व गाडी (५८१११) टाटानगर-ईतवारी मेमू दुर्गमध्ये ३० मिनिटे नियंत्रित करून पुढे रवाना करण्यात येईल. याशिवाय गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू दुर्गमध्ये समाप्त करून पुढील दिवसी दुर्गवरूनच गाडी (६८७२४) गोंदिया-रायपूर मेमू बनवून रायपूर व गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड मेमूला दुर्गमध्ये समाप्त करून पुढील दिवसी दुर्गवरूनच गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर मेमू बनवून रायपूर रवाना होईल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकांनी दिली आहे. (प्रतिनिधी)