शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे

By admin | Updated: April 21, 2016 02:12 IST

जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता

पालकमंत्री राजकुमार बडोले : खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गोंदिया : जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.सोमवारी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेताना सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, कृषी सहसंचालक घावडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समतीचे सभापती छाया दसरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी असताना बँकांनी सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात केवळ ४३ हजार ५६७ शेतकरी सभासदांना पीक कर्ज दिले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना बँकांनी पीक कर्ज द्यावे. बँकांचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगले बोलत नसून शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यात कुचराई करतात. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. सिंचन विभागाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी व ग्रामस्थांना पिण्यासाठी योग्यप्रकारे पाणी द्यावे. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढली पाहिजे, यासाठी लघु पाटबंधारे तलावांच्या दुरु स्तीचा कार्यक्र म हाती घ्यावा. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी भरारी पथके तयार करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जास्तीत जास्त प्रमाणात खते उपलब्ध करु न द्यावी. तूर पीक लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. भाजीपाला शेतीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग वळला पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना कृषी पंपाची जोडणी करून द्यावी असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषी पंप जोडणेसाठी निश्चित आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पंतप्रधान पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी या योजनेची माहिती कृषी विभागाने प्रत्येक गावात द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तालुका पातळीवर शिबिरातून व ग्रामसभेतून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना द्यावी, असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. श्री पद्धतीने धान लागवड करण्यास तसेच भाजीपाला पिके घेण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सन २०१५-१६ या वर्षात खरीप पेरणी १ लाख ९९ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि प्रमाणित खासगी कंपन्यांकडून १४ हजार ०५० क्विंटल अशी एकूण ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खताची मागणी ६० हजार मेट्रिक टन केली असता ६० हजार ७०० मेट्रिक टन खते मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा उपनिबंधक अहेर यांनी पीक कर्ज वाटप, वीज वितरण कंपनीचे चव्हाण यांनी कृषी पंपाना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाबाबत छप्परघरे यांनी माहिती दिली. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, सिंचन, पाटबंधारे व मध्यम प्रकल्पाचे अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. संचालन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांनी केले. आभार भोपळे यांनी मानले. (प्रतिनिधी)