शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

७५ कोटी किंवा तांदूळ जमा करावाच लागणार

By admin | Updated: April 4, 2017 01:01 IST

पणन हंगाम २००९ ते २०१२-१३ या हंगामात राईस मिलर्स असोसिएशनने शासनाकडून मिळालेला तांदूळ भरडाई केल्यानंतर परत केला नाही.

लोकआयुक्तांचा दणका : राईस मिलर्सच्या मनमर्जी कारभाराला लागणार लगामसौंदड : पणन हंगाम २००९ ते २०१२-१३ या हंगामात राईस मिलर्स असोसिएशनने शासनाकडून मिळालेला तांदूळ भरडाई केल्यानंतर परत केला नाही. त्यामुळे तो तांदूळ किंवा त्या तांदळाची रक्कम जवळपास ७५ कोटी रुपये शासनाकडे जमा करावी, असा आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूर या चार जिल्ह्यातील जमा झालेला तांदूळ राईस मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. खरीप व रबी हंगामात आदिवासी विकास महामंडळ (नाशिक), महाराष्ट्र स्टेट कॉआॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन मुंबई यांच्यामार्फत चारही जिल्ह्यात सन २००९ ते २०१३ या हंगामात आधारभूत धान केंद्रावर धान खरेदी करून चारही जिल्ह्यातील जमा झालेला धान राईस मिलर्स असोसिएशनला देण्यात आला होता. साधारणपणे एक क्विंटल धानामागे ६७ किलो तांदूळ अन्न महामंडळाकडे जमा करावा लागतो. परंतु २००९ ते २०१३ पर्यंतच्या कालावधीतील भरडाईसाठी राईस मिलधारकांना दिलेल्या धानातून २ लाख ९१ हजार ५६१.६६ क्विंटल सीएमआर तांदूळ सरकारकडे जमाच केला नाही. सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले यांनी लोकआयुक्त मुंबई यांचेकडे २ मार्च २०१६ ला यासंदर्भात लेखी तक्रार करून घोटाळ्याला वाचा फोडली. यावरून महाराष्ट्र शासनाने शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने दि. २ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशानुसार खरीप पणन हंगाम २००९ ते २०१३ च्या हंगामातील राईस मिलर्सकडे शिल्लक असलेला किंवा त्या तांदळाची रक्कम जवळपास ७५ कोटी रुपये जमा करावी, असा आदेश जारी केला आहे. बाजार समिती सदस्य रोशन बडोले यांनी या विषयावर तब्बल १ वर्ष पाठपुरावा केला व त्यांना यात यशही मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे आभार व्यक्त केले. परंतु ७५ कोटी रुपयांचा तांदूळ राईस मिलकडून वसूल करण्यासाठी शासनाचे अधिकारी कितपत प्रयत्न करतात, ही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.शासनाने भरपाईकरीता दिलेले धान मिल मालकांनी भरडाई न करताच आंध्रप्रदेशात विकले आहे. परराज्यातील निकृष्ट दर्जाचा तांदूळ रेशन दुकानामार्फत गरीबांना वाटप केला जातो, तोच तांदूळ शासकीय आश्रमशाळेतही दिला जातो असा आरोप बडोले यांनी केला आहे. परराज्यातील तांदूळ महाराष्ट्रामध्ये बेकायदेशिरपणे आयात व निर्यात केला जात आहे. राजकीय वरदहस्तामुळे वरकमाईच्या लालसेने मिलमालक करीत असलेल्या या गैरप्रकाराला आता पूर्णविराम मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.हा धान गुजरात व आंधप्रदेशात मोठ्या प्रमाण विकला जातो. ज्या ठिकाणी हा धान विकला जातो त्या ठिकाणाच्या राईस मिल बंद स्थितीमध्ये आहेत. ते कुठल्याही प्रकारची मिलिंगही करीत नाही तरीही हा धान शासनाला विकला जातो. मिलींगसाठी शासनाकडे राईस मिल नसल्यामुळे धान खासगी मिल मालकांना देण्यात येते. २००९ ते २०१३ पर्यंत आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनचा तांदूळ मिलवाल्यांनी केंद्र शासनाला परत केलेला नाही. त्यामुळे गोंदिया व भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. सडक-अर्जुनी, चिखलीमध्ये एक राईस मिल आहे. या राईस मिलमधून ककोडी येथील असलेल्या राईस मिलमध्ये नेला जातो तर सडक-अर्जुनी तालुक्यातील असलेले चिखली येथील राईस मिलमध्ये आणला जातो. ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून शासनाला लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. ४ वर्षात ३ लाख २६ हजार ३०८ क्विंटल तांदूळ विकला गेला. राईस मिल मिलकांनी आता न्यायालयाकडे धाव घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली आहे.