शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

३७३ पोलिसांना खडतर सेवेचे पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:14 IST

नक्षलग्रस्त भागात २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्यामार्फत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक दिले जाते. त्यानुसार, १६ मार्चला जिल्ह्यातील ६२ अधिकारी व ३११ कर्मचारी अशा एकूण ३७३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्दे४ डिवायएसपींसह ६२ अधिकारी : ३११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त भागात २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्यामार्फत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक दिले जाते. त्यानुसार, १६ मार्चला जिल्ह्यातील ६२ अधिकारी व ३११ कर्मचारी अशा एकूण ३७३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या विशेष सेवा पदकाचे मानकरी यंदा गोंदिया जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक व ४७ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तसेच ३११ कर्मचाऱ्यांची या विशेष सेवा पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यात गोंदियाचे उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, आमगावचे राजीव नवले, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गोंदिया पोलीस उपअधीक्षक गृह दीपाली खन्ना तर पोलीस निरीक्षकांमध्ये गोंदिया ग्रामीणचे सुरेश नारनवरे, मोटार परीक्षण विभागाचे राजेश लबडे, नक्षल सेलचे सुनील उईके, सालेकसाचे ठाणेदार मोहन खंदारे, देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, जिल्हा विशेष शाखेचे अशोक तिवारी, नक्षल आॅपरेशन सेल देवरीचे मंगेश चव्हाण, रामनगरचे ठाणेदार संजय देशमुख, रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर, केशोरीचे मनिष बंसोड, तिरोड्याचे संदीप कोळी यांचा समावेश आहे. उपनिरीक्षकांमध्ये गोरेगावचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सशस्त्र दूरपरिक्षेत्र धाबेपवनीचे नितीन कोळी, नवेगावबांधचे हनुमंत कवले, नक्षलसेलच्या राधीका कोकाटे, श्वान पथक गोंदियाचे यादव तमरेटी, रामकृष्ण सरवर, रावणवाडीचे लक्ष्मण कीर्तने, डुग्गीपारचे भगवान झरेकर, रामनगरचे योगेश शेलार, रावणवाडीचे सचिन साळवे, गोंदिया शहर येथील सागर पडवळ,डुग्गीपारचे सचिन पांढरे, दवनीवाडाचे अतुल कदम, गंगाझरीचे रोहीदास पवार, गोरेगावचे अजित पाटील, सालेकसाचे किशोर घोडेस्वार, गोंदिया शहर येथील सागर अरगडे, मारोती दासरे, चिचगडचे राजेंद्र यादव, रामनगरचे तुषार काळेल, रावणवाडीचे उद्धव हाके, गोंदिया ग्रामीणचे सुशिल लोंढे, तिरोडा येथील विरेंद्रसिंग बायस, देवरीचे वाचक फौजदार गणेश नावकर, गंगाझरीचे अवधूत बनकर, सालेकसाचे विजय गोपाळ, तिरोडाचे निखील कर्चे, श्वानपथक गोंदियाचे धर्मेंद्र मडावी, सशस्त्र दूरपरिक्षेत्र मुरकुटडोहचे (पिपरीया)े महेंद्र शहारे, गुन्हे तपास पथक गोंदियाचे रजनी तुमसरे, गोंदिया शहरचे संदीया सोमनकर, एओपी भरनोलीचे संदीप भोपळे, नक्षल आॅपरेशन सेल सालेकसाचे नितीन शिंदे, एओपी मगरडोहचे सुर्यकांत सपताळे, डुग्गीपारच्या निशा वानखेडे, नक्षलसेल गोंदियाचे कुलदीप कदम, एओपी मगरडोह बळीराम घंटे, सालेकसाचे गौरव देव, नवेगावबांधचे प्रतापसिंह शेळके, भिमराव बावरे, एओपी धाबेपवनीचे अभिजीत डेरे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, विशाल राजे, श्रीकांत डोंगरे, स्वप्नील उनवणे, डुग्गीपारचे केशव वाबळे, देवरी उपमुख्यालयातील जयदीप काटे व जितेंद्र बोरकर यांचा समावेश आहे. सोबतच गोंदियाचे मुख्य गुप्त वार्ता अधिकारी अमित सुरवसे, दिपेश गायधने, माया कथलेवार यांच्यासह ३०८ इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.