नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावात वीज, पाणी आणि रस्त्यांची सोय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते. परंतु कोरोना काळात वीज बिल माफ होईल, अशी चुकीची धारणा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवली. त्यात निधीही उपलब्ध झाला नाही व गावातील करवसुली रखडल्याने वीज बिल भरता आले नाही. परिणामी जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींवर तब्बल २२ कोटी ५५ लाख ४२ हजार ७०२ रुपयांचे वीज बिल थकून आहे. यामध्ये तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींनी २०३ मीटर घेतले असून त्यांच्यावर सात कोटी ४७ लाख ७६ हजार ४४० रुपये थकीत आहेत. तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींनी १५० मीटर घेतले असून त्यांच्यावर तीन कोटी १९ लाख १४ हजार ७८४ रुपये, आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींनी ७१ मीटर घेतले असून त्यांच्यावर ८९ लाख ७८ हजार ७१ रुपये, सालेकसा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींनी ८६ मीटर घेतले असून त्यांच्यावर एक कोटी तीन लाख ६७ हजार ७५ रूपये, देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी १६८ मीटर घेतले असून त्यांच्यावर ८९ लाख ५३ हजार १९९ रुपये, गोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींनी ११६ मीटर घेतले असून त्यांच्यावर एक कोटी २५ लाख २१ हजार २२१ रुपये, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींनी १२३ मीटर घेतले असून त्यांच्यावर तीन कोटी ३९ लाख ९६ हजार ३८९ रुपये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी १९३ मीटर घेतले असून त्यांच्यावर चार कोटी ४० लाख ३५ हजार ५१९ रुपये थकीत आहेत.
जिल्ह्यात ८ मीटर बंद - गोंदिया जिल्ह्यातील ८ मीटर कायमचे बंद करण्यात आले आहेत. त्यात गोंदियातील एक, आमगाव ४, सालेकसा १, देवरी २ असे ८ मीटर ग्रामपंचायतींचे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. त्या ८ मीटरचे थकीत वीज बिल दोन लाख ९६ हजार ९७८ रुपये आहे. ग्रामपंचायतींना ५ रुपये प्रति युनिट- ग्रामपंचायतींना ५ रुपये युनिटप्रमाणे वीज बिल आकारले जात आहे. काही ग्रामपंचायतींनी एप्रिल २०१८ पासून बिल भरलेले नाहीत. काहींचे ऑगस्ट २०१९ पासून तर काहींचे एप्रिल २०२० पासून बिल थकीत आहेत.