शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

१५ हजार पर्यटकांनी केली ‘जंगल सफारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:40 IST

धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी जंगल सफारी केली. चिमुकल्यांसह मोठ्यांची यात गिनती असून जंगल सफारीचा मोह आता आवरता आवरेना असे काहीसे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देकॉँक्रिटच्या जंगलातून निसर्ग सानिध्यात : वन विभागालाही भरभरून उत्पन्न

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी जंगल सफारी केली. चिमुकल्यांसह मोठ्यांची यात गिनती असून जंगल सफारीचा मोह आता आवरता आवरेना असे काहीसे चित्र बघावयास मिळत आहे.गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे. विशेष म्हणजे, वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे.व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट- कॉँक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ््यात शाळा-महाविद्यालयांना सुट्या असतात व वन्यप्राण्यांचेही दर्शन हमखास होते. अशात आपली सवड बघून १४ हजार ९४५ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्प गाठून जंगल सफारीचा आनंद घेतला.यंदाच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यातील ही आकडेवारी असून जंगल सफारी करणाऱ्या या १४ हजार ९४५ पर्यटकांत एक हजार ६८९ पर्यटक १२ वर्षा खालील तर १३ हजार ५०४ पर्यटक १२ वर्षावरील असल्याची माहिती आहे. यातील, मार्च महिन्यात तीन हजार ७८५, एप्रिल महिन्यात चार हजार ६२० पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली असतानाच मे महिन्यात सर्वाधीक सहा हजार ५४० पर्यटकांनी ‘जंगल सफारी’ केली आहे.फक्त ५२ विदेशी पर्यटकांचे आगमनयेथील नवेगाव-नागझिरा व्याग्र प्रकल्पाची आतरराष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण झाली आहे. वाघोबाचे घर म्हणून प्रकल्प ओळखले जात असताना कोठेतरी प्रकल्पाबाबत वन्यप्रेमींना माहितीचा अभाव दिसून येतो. कारण, उन्हाळ््याच्या या तीन महिन्यांत व्याघ्र प्रकल्पात फक्त ५२ विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे. लगतच्या कान्हा-केसली व ताडोबा प्रकल्पात मोठ्या संख्येत देशी-विदेशी पर्यटक ‘जंगल सफारी’साठी येत असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील विदेशी पर्यटकांची संख्या मात्र कमी दिसते. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.वन विभागाला १४ लाखांचे उत्पन्नपर्यटकांच्या माध्यमातून आपली तिजोरी भरावी हा वन विभागाचा कधीही हेतू नसतो. उलट नागरिकांत वन व वन्यजीवांप्रती आत्मियता निर्माण होऊन त्यांचे महत्व कळावे या उद्देशातून वनविभागाकडून ‘जंगल सफारी’ची सुविधा उपलब्ध करवून दिली जाते. असे असले तरिही, पर्यटकांच्या हजेरीने वन विभागाला आर्थिक उत्पन्न होत असून उन्हाळ््यातील तीन महिन्यांत वन विभागाला १३ लाख ९७ हजार दोन रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.