शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

१२ लघु प्रकल्प दोन दशकांपासून अर्धवट

By admin | Updated: April 11, 2017 01:09 IST

प्रत्येक गावालगत शिवारात मामा तलाव, लपा तलाव, गावबोडी मध्यम प्रकल्पा सारखे साधन असून सुद्धा तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचिर राहत असते.

९५४ हेक्टर जमीन सिंचनाच्या प्रतीक्षेत : वन कायदा व भूसंपादनाचे अडथळेविजय मानकर सालेकसाप्रत्येक गावालगत शिवारात मामा तलाव, लपा तलाव, गावबोडी मध्यम प्रकल्पा सारखे साधन असून सुद्धा तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचिर राहत असते. हे या तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांचे दुर्भाग्यच समजावे लागेल. अनेक ठिकाणी उश्या जवळ पाणी असून सुद्धा सिंचन प्रकल्प अपूर्ण पडल्याने शेतीत पाणी नेता येत नाही. उलट लाख मोलाचे पाणी नियोजना अभावी वाया जात राहते. हे तालुक्यातील सिंचन क्षेत्राचे वैशिष्ट्य बनले आहे. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव सालेकसा तालुक्यात असून सिंचनाच्या बाबतीत सालेकसा तालुका सर्वात मागासलेला वाटत आहे. याला मुख्य कारण म्हणजे येथील लघु प्रकल्प मागील दोन दशकांपासून रखडलेले आहेत.लघु पाटबंधारे विभागात मोडणारे जवळपास १२ लाख सिंचन प्रकल्प कोणत्या न कोणत्या कारणाने अपूर्ण पडले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत ओलीताखाली येणारी ९५४ हेक्टर शेत जमीन पाण्याविना तहानलेली पडून आहे. हे सर्व प्रकल्प पूर्णण झाल्यास तालुक्यात सर्वत्र सुजलाम सुफलाम होवून हरित क्रांती व श्वेत क्रांती घडण्यात मदत मिळेल. मात्र यासाठी शासन, प्रशासन स्तरावर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. त्याच बरोबर लोक प्रतिनिधींना जातीने लक्ष घ्यावे लागेल. तालुक्यातील मानाकुही, कहाली, दंडारी, टेकाटोला, सुरजाटोला, जांभळी, धनसुवा, मक्काटोला, लोहारा, कारुटोला, मरामजोब आणि पांढरी येथील लघू प्रकल्पाचे कोणते न कोणते काम अडकून असल्याने सिंचनासाठी सज्ज झाले नाहीत. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. यात मानाकुही प्रकल्प हा २१९ हेक्टर जमिनीला सिंचन करण्याचा क्षमता असून तलाव बनलेला आहे. परंतु कालवा बनलाच नाही. तसेच गेटचे काम योग्य पद्धतीने झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे साचलेले पाणी काही दिवसांतच लिकेजमुळे वाहून निघून जाते आणि ऐन वेळी संपूर्ण तलाव ठणठणाट झालेला असतो. या तलावाचे गेट बनवून कालव्याचे काम पूर्ण केल्यास सालेकसा व आमगाव खुर्द वितरिकेला मोठा लाभ मिळू शकतो. तसेच तलावाचे खोलीकरण करुन साठवण क्षमता वाढविण्यात येऊ शकते. एवढेच नाही तर या तलावाचा ओव्हरफ्लो मानागढ जलाशयात टाकण्याचे नियोजन सुद्धा तयार होऊ शकते. परंतु याकडे सपेशल दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकूण ६१ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकेल असा कहाली, खडखडीटोला लघू प्रकल्प ८० टक्के पूर्ण झाला. परंतु जमिनीच्या रकमेचे भूगतान न झाल्याने २० टक्के काम रखडलेले आहे. ७५ हेक्टर शेतीसाठी उपयुक्त ठरणारा दंडारी लघू प्रकल्प त्रुट्यांची पूर्तता न झाल्याने अपूर्ण पडलेला आहे. ४६ हेक्टर शेती साठी वरदान ठरणारा टेकाटोला प्रकल्प वन कायद्यात अडकला आहे. सुरजाटोला परिसरात ६१ हेक्टर शेतीसाठी उपयोगी ठरणारा सुरजाटोला प्रकल्प मंजुरीसाठी ठंडबस्त्यात आहे. एकूण ८५ हेक्टर शेतीसाठी कायद्याचा ठरणारा जांभळी प्रकल्प वन कायद्यात अडकून पडला आहे. ८० हेक्टरसाठी वरदान ठरणारा धनसुवा येथील लघू प्रकल्पाला रेल्वेच्या जमिनीचा अडथळा निर्माण होत आहे. ४४ हेक्टर जमिनीसाठी उपयोगी मक्काटोला प्रकल्प वनजमिनीच्या कायद्यात पडला आहे. १०० हेक्टर जमीन सिंचनासाठी उपयोगी ठरणारा लोहारा प्रकल्प भूसंपादन प्रस्तावासाठी थंडबस्त्यात आहे. तसेच २६ हेक्टरसाठी कारुटोला प्रकल्प आणि ६२ हेक्टर जमिनीसाठी उपयोगी असा मरामजोब लघू प्रकल्प सुद्धा भूसंपादनासाठी अडकू न पडलेला आहे. तसेच ९५ हेक्टर जमिनीला लाभ देणारा पांढरी काशीनाला प्रकल्प तयार झाला तरी सांडव्याच्या पाण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी अडकला आहे. असे तालुक्यात एकूण १२ प्रकल्प कोणत्या न कोणत्या कारणामुळे अपूर्ण किंवा रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्रात तालुक्यात एकीकडे जमीन कोरडी पडून राहते. तर पाण्याचे नियोजन होत नसल्याने लाख मोलाचे पाणी नदी नाल्यांत वाहून निघून जात आहे. अर्थात पाणी समोर असून ही तहान भागविता येत नाही, अशी परिस्थित दिसत आहे.दोन उपसा सिंचन योजना सुरुतालुक्याच्या कोटरा आणि बिजेपार येथील दोन्ही उपसा सिंचन योजना लघू पाटबंधारे विभागामार्फत सुरू आहे. यात कोटरा येथे २१७ हेक्टर साठी असलेल्या योजनेतून सध्या ४२ हेक्टर जमिनीला पाणी मिळत आहे. तसचे १८८ हेक्टर साठी बिजेपार येथील योजना सुरू आहे. चार कोल्हापुरी बंधारे उपयोगात नाहीतदेवरी विभीगांंतर्गत सालेकसा व आमगाव परिसरात एकूण चार कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु या चारही बंधाऱ्यांचा उपयोग सिंचनाखाली होताना दिसत नाही. यात वाघनदीवरील तीन आणि किंडगीपार नाल्यावरील एका बंधाऱ्याचा समावेश आहे. वाघ नदी वरील बाम्हणी, भजेपार, २१० हेक्टर सिंचन क्षेत्र, तिरखेडी २३० हेक्टर, पदमपूर, सावंगी २१० हेक्टर आणि किंडगीपार २३२ हेक्टर सिंचन क्षेत्रात समावेश आहे. शेतकरी आपल्या सोयीनुसार नदी नाल्यांचे पाणी सिंचनासाठी उपयोग करणार म्हणून या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा उपयोग पूर्णपणे होत नाही.