शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST

बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचा पुढाकार : २२५ विद्यार्थी गेले नियमित शाळेत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाºयांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने जून २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ११३ बालकांसाठी गोंदिया शहरात चार संक्रमण शाळा उघडल्या आहेत.कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या प्रशिक्षण केंद्राची संख्या १६ झाली आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने बालकामगारांसाठी चार शाळा उघडण्यात आल्या. या १६ केंद्रात ४५७ बालमजूर शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोह दंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होते.आता पुन्हा चार केंद्र सुरू करण्यात आले. हे चारही केंद्र गोंदिया शहरात आहेत. सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया केंद्र सुरू करण्यात आले.सुंदरनगर व यादव चौकात येथे ३० बालके, गड्डाटोली येथे २२ बालके व छोटा गोंदिया केंद्रात ३१ बालके असे ११३ बालके या चार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहेत. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत.१६२१ बालके मुख्यप्रवाहातबाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके स्वत:च्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. बाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात.सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.बालकामगारांसाठी १६ शाळाबालकामगारांच्या उत्थानासाठी शासनाकडून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात बाबाटोली, गौतमनगर, गोंडीटोला, कुडवा, भीमनगर, काचेवानी, दंडारी, नवरगाव, तिरोडा, मुंडीकोटा, मूर्री, अदासी, गोंदिया शहरातील सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया या ठिकाणी शाळा तयार करण्यात आले आहे.