शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

थिवीतील कंत्राटदाराला अपहरण करून लुटले

By admin | Updated: June 21, 2014 01:44 IST

बार्देस : धानवा-थिवी येथील अजू सी. एस. या कंत्राटदाराचे शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून आलेल्या आणि तोंडावर बुरखे घातलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले.

बार्देस : धानवा-थिवी येथील अजू सी. एस. या कंत्राटदाराचे शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून आलेल्या आणि तोंडावर बुरखे घातलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले. त्यांना नाकोडा-लोटली येथे नेऊन त्यांच्याकडील सोनसाखळी, ४६ हजार रुपयांची रोकड व डोळ्यावर मिरची पावडर मारून धनादेशावर सह्या करून पलायन केल्याची तक्रार शुक्रवारी म्हापसा पोलिसांत दिली. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजू सी. एस. हे आपल्या कारमधून धानवा-थिवीहून येत असताना त्यांच्या समोर महाराष्ट्र पासिंगची गाडी उभी राहिली आणि त्या गाडीतील तोंडावर बुरखे घातलेले चार जण अजू सी. एस. यांच्या गाडीत बसले. त्यांच्याबरोबर आणखीही एक गाडी होती. त्या चौघांनी त्यांच्याच गाडीत बसून त्यांना नाकोडा-लोटली येथे नेले आणि त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी, ४६ हजार रुपयांची रोकड प्रथम काढून घेतली. नंतर त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर मारून त्यांच्याजवळ असलेल्या धनादेशावर काही सह्या करून घेतल्या. स्टॅम्पही काढून घेतला आणि त्यांना तेथे सोडून पळ काढला. अपहरणकर्ते मोडकी तोडकी हिंदी भाषा बोलत होते. ते दक्षिण महाराष्ट्रातील उंच असे होते, असेही पोलिसांनी सांगितले. म्हापशाचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)