शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

दहशतवादाला थारा देणारेही तेवढेच घातक

By admin | Updated: October 17, 2016 05:50 IST

दहशतवाद्यांएवढेच त्यांना थारा देणारेही जगाच्या दृष्टीने घातक आहेत

बाणावली (गोवा) : दहशतवाद्यांएवढेच त्यांना थारा देणारेही जगाच्या दृष्टीने घातक आहेत, असे नमूद करून ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच ‘ब्रिक्स’ देशांनी याविरुद्ध एकदिलाने व अग्रक्रमाने लढा देण्याचा निर्धार रविवारी जाहीर केला.गेले दोन दिवस येथे भरलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या समारोपप्रसंगी या देशांदरम्यान झालेल्या मतैक्याचा ‘गोवा डिक्लेरेशन’ नावाचा एक दस्तावेज जाहीर करण्यात आला. भारत या यजमान देशाचे नेते या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी हा जाहिरनामा वाचून दाखविला. या परिषदेत जगाला असलेला वाढत्या दहशतवादाचा धोका हा मुख्य विषय राहिला व या जाहिरनाम्यातही त्याचेच प्रतिबिंब दिसले.‘ब्रिक्स’चा निर्धार जाहीर करताना मोदी म्हणाले, ‘दहशतवाद आणि हिंसाचारी शक्तींना पोसणारे, त्यांना आश्रय देणारे, व त्यांची पाठराखण करणारे हेही आमच्यासाठी खुद्द दहशतवाद्यांएवढेच धोकादायक आहेत, यावर आमचे एकमत झाले. दहशतवाद, धार्मिक कट्टरवाद आणि अतिरेकीवाद यापासून असलेला धोका आम्ही सर्वांनी मान्य केला.‘गोवा डिक्लेरेशन’मध्ये ‘ब्रिक्स’ देशांमधील सहकार्याचा सर्वंकष असा भावी मार्ग ठरविण्यात आला असून सीमापार दहशतवादासह सर्वच प्रकारचा दहशतवाद आणि त्यांना साथ देणारे यांच्याविरुद्ध लढा देण्यास त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय शिखर परिषदेतील नेत्यांनी ज्या इतर मुद्द्यांवर भर दिला त्यात आर्थिक विकास आणि पर्यावरण रक्षण यांत समन्वय साधण्याचाही समावेश होता. हवामान बदलास आळा घालण्याच्या उपायांसंबंधीचा पॅरिस करार अपेक्षेहून लवकर लागू होत असल्याचे आम्ही स्वागत करतो व हा करार २ आॅक्टोबर रोजी संमत केल्याचा भारतास अभिमान वाटतो, असेही मोदी म्हणाले. ‘ब्रिक्स’ देशांनी स्थापन केलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ने एक वर्ष पूर्ण केले आहे. या बँकेने पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकास आणि अक्षय ऊर्जासाधने यावर भर देणे सुरु ठेवावे, असेही या शिखर परिषदेत ठरले. याच्या जोडीला ‘ब्रिक्स’ची स्वत:ची स्वतंत्र ‘रेटिंग एजन्सी’ स्थापन करण्याच्या कामाला गती देण्याचेही ठरले. ही आठवी ‘ब्रिक्स’ शिखर परिषद होती. पुढील शिखर परिषदेचे यजमानपद चीनकडे असेल. बांगलादेश, म्यानमार, नेपाळ व थायलँंड या देशांना निमंत्रित म्हणून परिषदेसाठी बोलाविण्यात आले होते. या निमंत्रित देशांच्या प्रतिनिधींनीही आपसात व सदस्य देशांशी बैठका घेऊन उभयपक्षी विषयांवर चर्चा केली. (विशेष प्रतिनिधी)>यश-अपयशहीउरी येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक्स या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला लक्ष्य करण्यात व राष्ट्रीय हितासाठी प्रसंगी सीमा ओलांडूनही कारवाई करण्याचा हक्क ‘ब्रिक्स’ नेत्यांना पटवून देण्यात भारताला यश आले.मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी वाटाघाटी केल्या. चीनला पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यात मोदींना अपयश आले.