शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

सत्तरीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: April 13, 2015 01:17 IST

ठाणे-सत्तरी : पाली येथे लागण झालेल्या गूढ साथीचे नेमके निदान करण्यास तसेच ही साथ आटोक्यात आणण्यास सरकारला अपयश आले

ठाणे-सत्तरी : पाली येथे लागण झालेल्या गूढ साथीचे नेमके निदान करण्यास तसेच ही साथ आटोक्यात आणण्यास सरकारला अपयश आले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याबाबतही हेळसांड सुरू असल्याचा आरोप रविवारी ठाणे येथे झालेल्या झालेल्या सत्तरीतील सेवाभावी कार्यकर्ते व रहिवाशांच्या बैठकीत करण्यात आला.पालीतील साथ व सार्वजनिक आरोग्य याबाबत चर्चा करण्यासाठी सत्तरीतील सेवाभावी कार्यकर्त्यांतर्फे ठाणे येथील ग्रामीण आरोग्य केंद्राजवळ ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सत्तरीतील विविध भागातील सेवाभावी कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील नागरिक या बैठकीत सहभागी झाले होते.सरकारचे दुर्लक्षपाली भागात पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यास तसेच या साथीचे नेमके निदान करण्यास आरोग्य खात्याला अपयश आले असून ही सरकारची निष्क्रियता आहे, असा आरोप सत्तरी युवा जागृती मंचाचे अध्यक्ष विश्वेश प्रभू परोब यांनी केला. तसेच आरोग्याबाबत होणारी हेळसांड, दारूचे व्यसन, अंधश्रध्दा यामुळे समाजाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकार्यकर्ते सीताराम गावस यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. तसेच लोकशिक्षणाबरोबरच आरोग्य जागृती घडवून आणावी, असे आवाहन केले.लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या नमन सावंत यांनी ही साथ आटोक्यात आणण्यास इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे सांगून सामाजिक आरोग्य बिघडण्यास नागरिकही जबाबदार असल्याचे सांगितले. साथीचे नेमके निदान करून साथ नियंत्रणात आणणे हे सरकारचे काम आहे; पण सार्वजनिक आरोग्य राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्याबाबत दीर्घकालीन उपाय हवेत. तसेच शिक्षण, आरोग्य जागृती याचा प्रसार व्हायला हवा.शौचालये निष्कृष्ट दर्जाचीसरकारतर्फे पुरवण्यात येणारी शौचालये निष्कृष्ट दर्जाची असून वापरण्यालायक नाहीत. चांगल्या दर्जाचे शोचालय उभारण्यासाठी सरकारने अनुदान वाढवायला हवे, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.केरी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारोडकर यांनी साथीसारखे प्रकार घडण्यास मूलभूत विकासाकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगून विकासाच्या नावाने मोठमोठे प्रकल्प उभारण्यापेक्षा नागरिकांच्या मूळ गरजांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. सालेली येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावस यांनी ही साथ आटोक्यात आण्यासाठी तातडीने उपाय योजण्याचे आवाहन केले. यावेळी पांडुरंग गावस, आत्माराम गावस, उल्हास नाईक, तुळशीदास गावकर, बाळकृष्ण नाईक, श्रीपाद पार्सेकर, रमेश गावस, अर्जुन म. गावकर, गाब्रियल कॉस्ता, विश्वनाथ नेने, पद्माकर केळकर इत्यादींनी मते मांडली. सभेचे संचालन आत्माराम गावस यांनी केले.(खास प्रतिनिधी)