बार्देस : थिवी येथील होंडा शोरुमसमोरील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्कूटरची (क्र. जीए ०३ क्यू ९९०६) धडक बसल्याने रस्ता ओलांडणारे जालंदर शामराव शेवडे (वय ५१, रा. अवचितवाडा-थिवी) हे जागीच ठार झाले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरचालक विनोद रामा पालकर हा ३५ वर्षीय युवक कांदोळी येथे वाहनचालक म्हणून कामाला असतो. तो दुचाकीवरून अडवलपाल येथील घरी जात असता, थिवी येथे जालंदर शेवडे हे मध्येच आल्याने दुचाकीची त्यांना धडक बसली. यात शेवडे हे जागीच ठार झाले, तर विनोद हा स्कूटरवरून खाली पडल्याने रस्त्यावर आदळून त्याच्या डोक्याला, पायाला, हाताला व कंबरेला गंभीर इजा झाली. या अपघाताची माहिती मिळताच म्हापशाचे पोलीस हवालदार सूर्यकांत मांद्रेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत करत आहेत. (प्रतिनिधी)
थिवी येथे पादचारी ठार
By admin | Updated: January 9, 2016 02:35 IST