शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

लाचप्रकरणी अटकेतील पंचांची चौकशी सुरू : घराची झडती

By admin | Updated: February 14, 2015 03:48 IST

मांद्रे : लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कोरगावचे माजी सरपंच तथा पंच सुदीप कोरगावकर व पंच डॉमनिक फर्नांडिस यांना लाचलुचपत

मांद्रे : लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कोरगावचे माजी सरपंच तथा पंच सुदीप कोरगावकर व पंच डॉमनिक फर्नांडिस यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी कोरगाव येथे आणून त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. उपअधीक्षक सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. दरम्यान, या लाच प्रकरणाशी पंचायतीचा काहाही संबंध नसल्याचे सरपंच पंढरी आरोलकर यांनी स्पष्ट केले आहे. हरमल येथील समाजकार्यकर्ते मॉर्गन त्रावासो यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच कोरगावकर व फर्नांडिस यांना मॉर्गन त्रावासो यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, आपण कोरगाव-भटवाडी येथे घेतलेल्या जागेत कोणतेच बेकायदेशीर काम केले नाही. मग पंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे तक्रारदार त्रावासो यांनी सांगितले. दरम्यान, कोरगाव येथील एका नागरिकाने त्रावासो यांनी कोरगाव-भटवाडी येथे घेतलेल्या जागेत चाललेल्या कामाविषयी तक्रार दखल केल्याने यासंदर्भात पंचायतीने त्रावासो यांना नोटीस पाठवून यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी अजून कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच ते पंचनाम्यावेळी हजर राहिले नाही, असे सरपंच आरोलकर यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाचा अटक प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे ते म्हणाले. लाच देऊन प्रकरण मिटवणे किंवा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मला गरजच नाही. त्या ठिकाणी आपण कोणतेच बेकायदेशीर काम केले नाही. उलट तिथे असलेल्या नाल्यासाठी आपण दगड वापरून संरक्षण कुंपण उभारले असल्याचे त्रावासो यांनी स्पष्ट केले. पंचायतीकडून सामान्य माणसाला छळण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण भ्रष्टाचारविरोधी असून पंचायत पातळीवर चाललेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे ते त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)