शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

मोबाईल अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमचा गेम करू शकतात - हॅरॉल्ड डिकॉस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 22:43 IST

 हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

पणजी: 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या म्हणीची प्रचिती डिजिटलायझेशनच्या या युगात लोकांना येवू लागली आहे. इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार या गोष्टी व्यवहाराच्या भाग बनत चालल्यामुळे त्या सोडून चालत नाहीत, परंतु या गोष्टी हाताळताना थोडीशी जरी निष्काळजी झाली तर मोठ्या अडचणीत सापडण्याचेही शक्यता असल्याचे  सायबर तज्ज्ञ हॅरॉल्ड डिकॉस्ता सांगतात. चुकीचे  मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानेही तुमच्या बँक खात्यात हॅकर्स डोकावू शकातात, असे ते सांगतात.  हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

प्रश्न: सायबर सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मोठा धोका कुठे आहे?हॅरॉल्ड डिकॉस्ता : सोशल मिडियाचा बेजबाबदारपणे होणारा वापर हा पत्कारण्यात आलेला सर्वात मोठा धोका आहे. या साईटवर खाती खोलून लोक आपली छायाचित्रे, जन्मतारीख व इतर सर्व प्रकारची व्यक्तिगत माहिती टाकतात. या माहितीचा वापर करूनही सायबर गुन्हेगार आपल्या बँक खात्यात डोकावू शकतात. असे अनेक प्रकारही घडलेले आहेत. आपली गोपनीय माहिती गोपनीयच राहू द्यावी. 

प्रश्न: सायबर गुन्हेगाराना पकडणे आव्हान का ठरते?हॅरॉल्ड डिकॉस्ता : भारत हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. इंटरनेटचा वापर करणारेही देशात सर्वाधिक लोक आहेत. इंटरनेटच्या वापराबद्दल व त्यातील संभाव्य धोक्यांविषयी माहिती नसलेले लोकही त्यात आहेत. त्यामुळे ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. एकदा फसवणूक झाली की नंतर सायबर गुन्हेगाराचा तपास लावणे खूप कठीण असते. कारण ज्या वेबसाईटचा आपण वापर करतो त्यापैकी बहुतेकांचे सर्व्हर हे विदेशात आहेत. 

प्रश्न: ई-शॉपिंग कितपत सुरक्षित?हॅरॉल्ड डिकॉस्ता : इ शॉपिंग हे खबरदारी घेतल्यास सुरक्षित नपेक्षा केव्हाही धोकादायक ठरू शकते. इशॉपिंग करताना आपल्या वैयक्तीक मोबाईल किंवा संगणकाचा वापर करावा. सार्वजनिक नेटवर्कवर असे व्यवहार करू नयेत. तसेच ओटीपी पद्धतीचे व्यवहार निवडा.  भेदण्यास कठीण असा पासवर्ड ठेवावा. 

प्रश्न: भीम अ‍ॅपचा वापर वाढत आहे. हॅरॉल्ड डिकॉस्ता : होय. भीम अ‍ॅपच्या व्यवहाराला पास कोड, मोबाईल व बँक डिटेल्स व नंतर युपीआय अशी तिहेरी सुरक्षा आहे. त्यामानाने खूप सुरक्षित आहे असे म्हणता येईल. परंतु सर्व प्रकारच्या सुरक्षा या आपल्याच अज्ञानामुळे भेदल्या जाऊ शकतात. विशेषत: मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करताना खबरदारी घेतली पाहिजे.

(मुलाखत: वासुदेव पागी)

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoaगोवा