शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

९९ टक्के मसाज पार्लर बेकायदा

By admin | Updated: July 7, 2014 02:35 IST

राज्याचे चित्र : एकाकडेच परवाना तरीही स्पाच्या नावाखाली सुळसुळाट

वासुदेव पागी-पणजी : गोव्यात सध्या बेकायदेशीर मसाज पार्लरांचा सुळसुळाट सुरू आहे. सरकारी माहितीनुसार एकूण ९९ टक्क्यांवर मसाज पार्लर बेकायदा आहेत; कारण कायदेशीर परवाना असलेले एकच पार्लर गोव्यात आहे. एका सर्वेक्षणानुसार गोव्यात सुमारे १७० मसाज पार्लर आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार केवळ एक मसाज पार्लरला परवाना दिल्याची माहिती आरोग्य खात्याचे उपसंचालक जुझे डिसा यांनी दिली. हे पार्लरही दक्षिण गोव्यात माजोर्डा येथे आहे. परवाने दिलेल्या पार्लरची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. मागील विधानसभा अधिवेशनात याविषयी सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांवर पार्लर ही कोणत्याही परवान्याशिवाय चालत असल्याचे स्पष्ट होते. चेहऱ्याला हलकी मसाज देणारी स्पा केंद्रे गोव्यात खूप आहेत. त्यातील ६४ केंद्रांची आरोग्य खात्यात नोंदणी आहे, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. गुन्हा अन्वेषण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पा म्हणून नोंदणी करून तेथे मसाज केंद्रे चालविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सीआयडीच्या छाप्यातून अनेकवेळा हे प्रकार उघडकीस आले आहेत. हा प्रकार बेकायदा आहे. मसाज ही आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. विशेषत: वातनाशक म्हणून या उपचारपद्धतीकडे पाहिले जाते. त्यासाठी विशेष पद्धतीचे प्रशिक्षणही घ्यावे लागते; परंतु गोव्यातील मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला, पुरुषांजवळ कोणत्याही अधिकृत शिक्षणाचे प्रमाणपत्र नाही. पोलिसांकडून जेव्हा छापे टाकले जातात, तेव्हा ताब्यात घेतलेल्या महिला आणि पुुरुषांकडेही पोलिसांकडून मसाज प्रशिक्षणाचा अधिकृत दाखला मागितला जातो. हा दाखला त्यांच्याकडे नसतो. सीआयडीच्या छाप्यात ताब्यात घेतलेल्या महिलांकडेही अशी प्रमाणपत्रे नव्हती. ही मसाजची बदनामी मसाजच्या नावाने काहीही खपविले जाते, ही बदनामी असल्याचे आयुर्वेदिक वैद्य दिवाकर वेळीप यांचे म्हणणे आहे. प्रत्येक माणसाची प्रकृती, व्याधी पाहून मसाज द्यायचा असतो. त्यासाठी आयुर्वेदाची माहिती हवी. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आयुर्वेदात ‘क्रॉस मसाज’ पद्धती म्हणजे पुरुषांना महिलांनी आणि महिलांना पुरुषांनी मसाज देण्याची पद्धत नाही, असे ते म्हणाले.