शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

सेवा देताना त्यागाची भूमिका ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:01 IST

रुग्णाच्या जवळ राहून त्याला सेवा देण्यात परिचारिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे आरोग्यसेवा देताना परिचारिकांनी हिंमत, त्याग या गोष्टींचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी केले.

ठळक मुद्देनर्सिंग कॉलेजमध्ये टॅलेन्ट कॉन्टेस्ट : अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : रुग्णाच्या जवळ राहून त्याला सेवा देण्यात परिचारिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे आरोग्यसेवा देताना परिचारिकांनी हिंमत, त्याग या गोष्टींचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी केले.डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव येथे स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनतर्फे ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्टचे आयोजन १८ जानेवारी रोजी करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.किलनाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे, चातगावचे सरपंच सुनंदा गावडे, माजी सरपंच नारायण सयाम, प्रतापशाहा मडावी, नीता मडावी, माजी उपसरपंच पांडुरंग कुमरे, पोलीस पाटील गोविंद पाटील, प्राचार्य दीप्ती तादुरी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार महेंद्र गणवीर म्हणाले, नर्सेसची लहानशी चूक देखील रुग्णाचा जीव घेऊ शकते. त्यामुळे परिचारिकांनी त्यागी व समर्पित वृत्तीने सेवा द्यायला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. डॉ.प्रमोद साळवे यांनी विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्यांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कलागुण राहतात. ते पुढे आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.संचालन सुनीता पुसाली तर आभार मानसी साळवे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पूजा कुमरे, मोनाली गडपडे, प्रगती साळवे, मानसी साळवे, सुष्मिता रॉय, प्राची नारनवरे, अपर्णा मंडल, वंदना मंडल, प्रियंका सोयाम, अश्विनी अंबादे, रोजा आत्राम, नंदिनी मडावी, सुनीता पुसावी, मैथिली गजभिये, काजल उईके, ओजस्वीनी नरताम, काजल उडाण, प्रांजली वलके, प्रतिभा रामटेके, उज्ज्वला ताडाम, यशस्वीनी दुग्गा, पुष्पा सिडाम, रेश्मा हिचामी, बबीता पुराम, मनीषा वेलादी, ज्योत्सना सिडाम, प्रियंका वट्टी, प्रफुल्ल कोसरे, रोशन करंडे, अजय आतलामी, सुशील निकेसर, निकेशकुमार आलाम यांनी सहकार्य केले.सदर नर्सिंग कॉलेजतर्फे वर्षभर विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात.आज शेती व्यवस्थापनावर मार्गदर्शनडॉ.साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता शेतकरी व शेती व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण’चे प्रणेते शैलेश अग्रवाल हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी पांडव ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट नागपूरचे सचिव किरण पांडव, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, डॉ.प्रमोद साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करून समारोप होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य