शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:28 IST

२०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा पथदर्शी कार्यक्रम सर्च आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंबाखूला बंदी व व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देअभय बंग यांचे प्रतिपादन : व्यसनमुक्ती संमेलनात विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : २०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा पथदर्शी कार्यक्रम सर्च आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंबाखूला बंदी व व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यात अनेक अडचणी आणि संकटे येत असली तरी यावर मात करून संघटनेची ताकद विक्रेत्यांना दाखवून देत गावाची दारूबंदी तुम्हीच साध्य करू शकता, असा आशावाद डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.देसाईगंज येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे व्यसनमुक्ती संमेलनात ते गुरूवारी बोलत होते. चार कलमी कार्यक्रमांचाच आधार घेत तालुक्यातील गावे दारूबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली आहे तर काही या मार्गावर आहेत. या सर्व गाव संघटनांना येणाऱ्या अडचणी, आव्हाने व मिळालेले यश इतर गावांना कळावे तसेच चर्चात्मक पद्धतीने दारूबंदीसाठी मार्ग काढता यावा यासाठी सदर संमेलन घेण्यात आले. संमेलनाला ३० गावातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम वडसा तालुक्यातील दारूमुक्ती आंदोलनाचा आढावा घेताना डॉ. बंग म्हणाले, वडसा हा सुरुवातीपासूनच जागरूक तालुका राहिला आहे. लढाऊ कार्यकर्ते ही या तालुक्याची ओळख आहे. १९८७ पासून जिल्ह्यात सुरु झालेल्या दारूमुक्ती आंदोलनात सर्वात सक्रीय देसाईगंज तालुका होता. बेकायदेशीर दारूविक्री तालुक्यात तेव्हाही होती. आजही आहे. पण गावाची दारूबंदी या आंदोलनात सहभागी होत अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली होती. आजही यातील बहुतेक गावांनी ती टिकवून ठेवली आहे. आज गावांच्या साथीला मुक्तिपथ भक्कमपणे उभे आहे. गाव पातळीवर संघटना दारूविक्रेत्यांना ‘सळो की पळो’ करून सोडत आहे. असंख्य अडचणीतून मार्ग काढत आहेत. याच प्रयत्नांतून दारूमुक्ती नक्कीच साध्य होईल असेही ते यावेळी म्हणाले.उपस्थित गाव संघटनेच्या सदस्यांनी गावातील दारू बंद करताना आलेले अनुभव विषद केले. काही गावांना अद्यापही पूर्ण दारूबंदी साध्य झालेली नाही. महिला प्रयत्नशील आहेत. पण विक्रेते ऐकत नसल्याने अपयश येत असल्याचेही अनेक महिलांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावर आवश्यक उपायही डॉ. बंग यांनी सुचविले. दारूबंदी हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. पीक येण्यासाठी शेती आपल्याला दरवर्षी कसावी लागते. जेवणही आपण रोज करतो. तसेच दारूबंदीचे आहे. ती सातत्याने करावी लागणार आहे आणि त्यासाठी तयारही राहावे लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता यांनी दारूबंदीसाठी आवश्यक उपाययोजना करताना गावांनी संघटीत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. दारूविकेते मुजोर झाले आहे. पण चार कलमी कार्यक्रमाचा योग्य वापर केल्यास त्यांच्या मुजोरीला आवर घालून गावाला दारूमुक्त करणे शक्य असल्याचे गुप्ता म्हणाले.संमेलनाला २० गावांतील संघटनाचे सदस्य उपस्थित होते. गाव संघटनांच्या बळकटीकरणासाठी तालुका संघटना गठीत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक भारती उपाध्ये, उपसंघटक राकेश खेवले यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न आवश्यकगाव संघटनेचे सदस्य दारू पकडतात. पोलिसांच्या स्वाधीन करतात. पण सदोष पंचनामा, साक्षीदार आणि पंचांनी समन्स कडे लेलेले दुर्लक्ष यासह इतरही बाबींमुळे केसेस दुबळ्या होत जातात. त्यातच कायदेशीर कारवाई वेळखाऊ असल्याने अनेकदा निराशा येते. पण या सर्व बाबी समजून घेत दारूविक्रेत्यांविरोधातील कायदेशीर तक्रारी बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर डॉ. अभिता वासनिक यांनी गाव संघटनांना मार्गदर्शन केले. कुणाच्याही दबावाला बळी न पडता थेट साक्ष देण्याची गरजही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिलांसोबतच गावातील नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वासनिक यांनी सांगितले.