मागील आठवड्यात २६ ऑगस्ट राेजी बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८७१, कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८० व काेरची ग्रामीण रुग्णालयात १० असे एकूण १ हजार ६१, ३१ ऑगस्ट राेजी बोटेकसा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १ हजार ११, कोटगुल प्राथमिक आराेग्य केंद्रात ११०, कोरची ग्रामीण रुग्णालयात १० असे १ हजार १३१ डाेस देण्यात आले. मागील आठवड्यातील ४ दिवसात ३ हजार १२३ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डाेस घेतला. काेरची शहरात ३२४ नागरिकांनी लस घेतली. पुढील शिबिरामध्ये अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन नगरपंचायत अधिकारी बाबासोा हाक्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी केले. यावेळी डॉ. शुभम वायाळ, माजी नगरसेवक घनश्याम अग्रवाल उपस्थित होते.
बाॅक्स
असा मिळाला प्रतिसाद
कोरची तालुक्यात ४५ वर्षांवरील लोकसंख्या १२ हजार ३३ आहे. यापैकी ९ हजार ३१५ लोकांनी लस घेतली. १८ वर्षांवरील १५ हजार ९६७ लाेकांपैकी ९ हजार ४ युवकांनी लस घेतली. तालुक्यात एकूण २८ हजार लोकसंख्या आहे. यापैकी आतापर्यंत १८ हजार ३१९ लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डाेस १५ हजार १४४ तर दुसरा डाेस ३ हजार १७५ लाेकांनी घेतला. तालुक्यातील लसीकरणाची टक्केवारी ६५ टक्के आहे.