लसीकरणाला सुरुवात झाली, त्यावेळी केवळ काेविशिल्ड या लसीचाच पुरवठा केला जात हाेता. काही दिवसांनी काेव्हॅक्सिन ही लस काही केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली. काही नागरिकांनी या लसीचा पहिला डाेस घेतला आहे. मात्र, त्यानंतर या लसीचा पुरवठा बंद करण्यात आला. आता पुन्हा पुरवठा केला जात आहे. ताेही काेविशिल्डच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे काेव्हॅक्सिन ही लस केवळ दुसरा डाेस देण्यासाठीच वापरली जात आहे. सध्या जिल्ह्यात ९२ हजार ७६० काेविशिल्ड, ९ हजार ४०० काेव्हॅक्सिन उपलब्ध आहेत.
बाॅक्स
दाेन्ही लस सारख्याच परिणामकारक
काेविशिल्ड व काेव्हॅक्सिन या दाेन्ही लस सारख्याच परिणामकारक आहेत, तसेच लस घेण्यास इच्छुक असलेला व्यक्ती काेणत्या कंपनीची लस उपलब्ध आहे याचा विचार करीत नाही. जी लस उपलब्ध आहे ती लस घेण्यास तयार राहते. जिल्ह्यात आता जास्तीत जास्त काेविशिल्ड लसीचाच पुरवठा केला जात असल्याने तीच लस नागरिकांना उपलब्ध हाेणार आहे.
---------------------------काेट
दाेन्ही लसी सारख्याच परिणामकारक आहेत. नागरिकांनी काेणताही संकाेच न बाळगता जी लस उपलब्ध आहे ती लस घ्यावी. शासनाकडून काेविशिल्ड लसीचाच सर्वाधिक पुरवठा केला जात असल्याने हीच लस पहिल्या डाेससाठी वापरली जात आहे. काेव्हॅक्सिन ही लस दुसऱ्या डाेससाठी वापरली जात आहे.
-----------------------------सध्या उपलब्ध साठा
काेविशिल्ड - ९२,७६०
काेव्हॅक्सिन - ९,४००
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण लसीकरण
कोव्हिशिल्ड-१,६१,३३६
काेव्हॅक्सिन-३९,४४८
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
वयाेगटानुसार लसीकरण
काेविशिल्ड काेव्हॅक्सिन
पहिला दुसरा पहिला दुसरा
आराेग्य कर्मचारी ८५२० ६७१८ ३१० १९२
फ्रंटलाईन वर्कर १८२६६ ८६९८ ४४४० ३४२६
१८ ते ४४ ८२६२ १ ० ०
४५ ते ५९ ४५४१२ ४३६० ६८२१ ५८५६
६० वर्षावरील ३५१५५ ४९५८ ५८६४ ४७४८